शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

तीन चोऱ्यांमध्ये ४९ हजारांचा माल लंपास

By admin | Updated: June 21, 2014 01:58 IST

शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़...

वर्धा : शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ तीनही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास शहरात तसेच परिसरात घडल्या़ जुनी म्हाडा कॉलनी परिसरातील मारोती बाबा समाधीजवळ असलेल्या कांता मुंजेवार यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरूवारी घडली. मुंजेवार बाहेरगावी गेल्या असताना चोरट्याने मागील दाराची कडी तोडून कपाटातील सोन्याची पोत, गोफ, अंगठी, चांदीचे भांडे व रोख २ हजार रुपये असा २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या चोरीत रोहणी ते शिरपूर रोडवर असलेल्या सायकल पंक्चरच्या दुकानात ठेवलेल्या पेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली़ याबात वसीम अंसारीच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी भादंविच्या कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला़ वसीम दुकानात झोपून असताना ही घटना घडली़ तिसरी चोरी पालोरा शिवारात घडली़ यात राष्ट्रीय महामार्ग क्ऱ ६ वरील पालोरा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकमधून चोरट्यांनी औषधी चोरीचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला. रामेश्वर विश्वकर्मा हे नागपूर येथून अहमदाबादकडे औषधी पेट्या घेऊन जात होते. त्यांनी विश्रांतीकरिता ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दरम्यान चोरट्यांनी ताडपत्री फाडून पेट्या चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. यात १४ हजार रुपयांचे नुकसान झाले.(स्थानिक प्रतिनिधी)