शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी पळविल्या कचरा पेट्या

By admin | Updated: August 29, 2014 00:02 IST

‘कार्य आमचे सहकार्य तुमचे’, असे घोषवाक्य कचरा पेट्यांवरील पाट्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने लिहिले़ सहकार्यातून स्वच्छता, असा उद्दात्त हेतू ग्रामपंचायतीचा होता; पण या वाक्यालाच हरताळ

सेवाग्राम : ‘कार्य आमचे सहकार्य तुमचे’, असे घोषवाक्य कचरा पेट्यांवरील पाट्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने लिहिले़ सहकार्यातून स्वच्छता, असा उद्दात्त हेतू ग्रामपंचायतीचा होता; पण या वाक्यालाच हरताळ फासण्याचे काम चोरट्यांनी केले़ गावातील कचरा पेट्याच चोरट्यांनी लंपास केल्या़ यामुळे गावात कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़माजी सरपंच सूमन झाडे व उपसरपंच सुनील कोल्हे यांच्या कार्यकाळात प्रभाग क्ऱ १ व २ मध्ये नऊ कचरा पेट्या लावण्यात आल्या़ ओला आणि सुका, असा सर्व प्रकारचा कचरा नागरिकांनी या पेट्यांमध्ये प्रामाणिकपणे टाकण्यास सुरूवात केली़ बकालपण निर्माण होणार नाही, दुर्गंधी परसरणार नाही, असे प्रयत्नही ग्रामस्थांनी केले; पण यात सेवाग्राम ते नांदोरा मार्गावरील तसेच गोठाण परिसरातील कचरा पेट्या चोरट्यांनी लंपास केल्या़ आता कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक प्रभागामध्ये पाच याप्रमाणे याच प्रभागामध्ये सिमेंटचे ढोले कचरा पेटी म्हणून दिले होते. ते मोठे असल्याने कचऱ्याचा संग्रह अन्य ढोल्यांचा उपसा करेपर्यंत होत होता; पण या दोन प्रभागातील पेट्या लवकरच भरतात़ यामुळे कचरा खाली फेकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ स्वच्छतेचा भार एकट्या व्यक्तीवर असल्याने तो कामांना न्याय देऊ शकत नाही़ शिवाय नागरिकांचेही समाधान करू शकत नाही. यामुळे नव्या पेट्यांपेक्षा जुने ढोलेच चांगले होते, अशी प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत़ गावातील कचऱ्याच्या पेट्याही चोरटे लंपास करीत असल्याने ग्रा़पं़ प्रशासनावरही नव्याने खर्च करण्याची वेळ आली आहे़ पेट्या लहान व कचरा साठविण्यास अक्षम असल्याने गावात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसते़ नवनिर्वाचित सरपंच रोशना जामलेकर, उपसरपंच व ग्रा़पं़ सदस्यांनी याकडे विशेष लक्ष देत स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)