शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:08 IST

रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देदेवळीतील चोºयांचा उलगडा नाही : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी देवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्या. यापूर्वीही देवळीत चोºया झाल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाले असल्याचे दिसत असून त्यांना अटक करण्याचे आव्हाण पोलिसांना आले आहे.पोलीस सुत्रानुसार, धुनिवाले मठ परिसरात डॉ. सम्राट नंदकिशोर तोटे व रत्नाकर धानकुटे यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे कुलूप तोडल्याचे समोर आले. यात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पपीन रामटेके व नगराळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. तर याच वेळी स्थानिक बजाज चौकातून योगेश बाबूलाल पाली यांच्या मालकीची एम.एच. ३२/एन. ४४७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. तिन्ही घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. या संदर्भात पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे दिसून आले आहे. गत काही दिवसापांसून जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. देवळीत उच्छाद घालणाºया चोरट्यांकडून आता वर्धेत चोºया केल्याचा आरोप होत आहे. या चोरट्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.पंचनामा करूनही सुगावा मिळत नाहीदेवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच दिवशी पाच घरे फोडण्यात आली. यात सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र चोरट्यांचा कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. या पाच चोºयांपूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच भागात सतत तीन दिवस चोºया झाल्या. त्याचा छडा लावण्याकरिता पोलिसांना महिन्याचा कालावधी लागला होता. आता या चोºयांचा शोध लावण्यात आणखी किती दिवस लागेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.पोलिसांचा अभ्यास कमी, की चोरटे हुशारचोºयांची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळ गाठण्यात येते. देवळी आणि वर्धेत तसेच झाले. मात्र पंचनामा करणाºया पोलिसांच्या हाती काहीच आले नसल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांच्या शोधाकरिता श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या हातीही काहीच आले नाही. यामुळे पोलिसांचा चोºयांच्या तपासात अभ्यास कमी पडतो की चोरटे अधिक हुशार झाले, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.जिल्हा पोलिसांनी ज्या चोºया पकडल्या त्यात मोबाईल लंपास झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आता पोलीस केवळ मोबाईलच्या आधारावरच चोर पकडण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांनकडून होत असल्याचे दिसत आहे.पोलिसांचे लक्ष दारू अन् जुगारावरचजिल्ह्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केवळ दारू आणि जुगाराच्या गुन्ह्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सध्या दारू आणि जुगाºयांवरच कारवाई होत असल्याचे दिसून आले आहे.