शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

‘ते’ वयोवृद्ध दाम्पत्य श्रावणबाळ योजनेत

By admin | Updated: December 25, 2016 02:24 IST

घरी उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने हेटी येथील वयोवृद्ध दाम्पत्य भिक्षा मागून पोट भरत होते.

आकोली : घरी उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने हेटी येथील वयोवृद्ध दाम्पत्य भिक्षा मागून पोट भरत होते. श्रावणबाळ योजनेसाठी अनेकदा केलेले अर्ज निकषात बसत नाही, ही सबब करून नामंजूर करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून व्यथा मांडली. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी वृत्ताची दखल घेत विशेष बाब म्हणून सदर वयोवृद्ध दाम्पत्याला श्रावणबाळ योजनेचे अनुदान सुरू केले. बलदेव अमरगिर मेधानी (७५) व सुगंधा बलदेव मेधानी (७०) हे हेटी येथे चंद्रमोळी झोपडीत राहतात. घरची स्थिती हलाखीची असल्याने भिक्षा मागून पोट भरत होते. हलाखीची स्थिती असली तरी त्यांचे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नव्हते. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा, हा निराधार योजनेचा महत्त्वाचा निकष आहे. यामुळे अनेकदा अर्ज करूनही ते नामंजूर होत होते. त्यांनी कैफीयत मांडल्यानंतर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. तहसीलदार डॉ. होळी यांनी तलाठी एस.झेड. मरसकोल्हे यांना सदर दाम्पत्याचे निराधाराचे प्रकरण तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. अखेर श्रावणबाळ योजनेत सदर दाम्पत्याची निवड केली व तत्सम लेखी पत्रही दिले. योजनेत निवड झाल्याचे पत्र पाहताच त्या वयोवृद्ध दाम्पत्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. तुटपुंजी का होईना, मिळणारी मदत ही त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरली.(वार्ताहर)