शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उतरलेले ‘ते’ हेलिकॉप्टर सैन दलातील

By admin | Updated: May 30, 2017 01:04 IST

औरंगाबाद वरून नागपूरला जात असलेल्या हेलिकॉप्टरने अचानक आलेल्या वादळात भरकटल्याने ...

लोकामध्ये भीती अन् कुतूहल : भीतीपोटी अनेकांची धावपळलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : औरंगाबाद वरून नागपूरला जात असलेल्या हेलिकॉप्टरने अचानक आलेल्या वादळात भरकटल्याने तालुक्यातील उमरी (जिरा) येथे आकस्मिक लॅन्डींग केली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले होते. रविवारी रात्री १५ आसनी हेलिकॉप्टर औरंगाबादवरून नागपूरला जात होते. हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन सुभेद्रसिंग गुरूदेवसिंग, पायलट गिरीश कांत, श्री.के. मालविया व इंजिनिअर दिनेश्वर कुमार स्वार होते. सदर हेलिकॉप्टर नागपुरात पोहोचण्यापूर्वी आलेल्या वादळाचा जोर पाहता ते उमरी (जिरा) परिसरात उतरविले गेले. हेलिकॉप्टर उतरत असताना पडते की काय अशा भीतीने अनेकांनी घर सोडून पळ काढला. कुणी झाडाखाली लपले. कालांतराने सदर हेलिकॉप्टर सिंधु कांबळे यांच्या पडिक शेतामध्ये उतरले. हेलिकॉप्टर उतरविण्याची माहिती वर्धा नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच त्यांनी समुद्रपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. भगत घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर मुख्यालयातून सहायक पोलीस निरीक्षक रामसिंग ठाकूर, शिपाई योगेश ब्राह्मणे, गणेश मिसाळ, निलेश चव्हाण यांना बंदोबस्ताकरिता पाठविण्यात आले. पोलीस पोहोचल्यानंतर पायलट, कॅप्टन हे खाजगी वाहनाने नागपूरकडे रवाना झाले.