शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

‘ते’ झोपडपट्टीवासीय वर्षभरापासून बेघरच

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड परिसरात वसलेल्या नझुलच्या जागेवरील झोपडीधारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्याची मागणी प्रलंबित आहे. या झोपडपट्टीवर वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटावची

वर्धा : हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड परिसरात वसलेल्या नझुलच्या जागेवरील झोपडीधारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्याची मागणी प्रलंबित आहे. या झोपडपट्टीवर वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली होती. मात्र यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शास्त्री वॉर्ड येथे १९८५ पासुन नझुलच्या जागेवर गरीब कुटुंब झोपड्या उभारून वास्तव्य करीत आहेत. हात मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबांचा निवासाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे. ११ मे २०१३ ला तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जे.सी.बी. लावून संपूर्ण झोपड्या उध्वस्त केल्या. यामुळे येथील गरीब कुटुंबांचे घर उध्वस्त झाले असून संसार उघड्यावर सुरू आहे. उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. परंतू या जागेची भू सर्वेक्षण विभागाकडून मोजणी केली आहे. यात सदर जागा नझुलची असल्याचे समजते. अतिक्रमण हटाव घटनेची सर्र्वंकष चौकशी करावी. झोपडपट्टीधारकांना १९९५ च्या कायद्यानुसार पट्टे देण्यात याव, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे. पोलिसांनी कायदा हातात घेवून झोपड्या उध्वस्त केल्या. मात्र ही कारवाई अविध आहे. याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच दोषींवर कारवाई करून सेवेतून निलंबीत करण्यात यावे, झोपडपट्टी धारकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)