शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधींसारखे कणखर नेतृत्व होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:44 IST

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. संगीत, कला, वाचन, लिखान, राजकारण आदी अनेक बाबतीत त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी होते.

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड : डॉ. शरदराव काळे स्मृती व्याख्यानमाला

ऑनलाईन लोकमत आर्वी : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. संगीत, कला, वाचन, लिखान, राजकारण आदी अनेक बाबतीत त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी होते. त्यांच्या अनेक निर्णयांमुळे त्या सर्वसामान्यांमध्ये कायम नाळ जोडून राहिल्या. त्यांच्यासारखे नेतृत्त्व भविष्यात होणार नाही, असे प्रतिपादन राकाँचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान मालेत ते बोलत होते. सदर कार्यक्रम डॉ. शरदराव काळे स्मृती व्याख्यानमालेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत गुल्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नंदकिशोर दिक्षित, आ. अमर काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.आव्हाड पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी यांचा १९७७ ते १९८० या काळात निवडणुकीत पराभव होवूनही त्या खचल्या नाही. त्यांनी पक्षाला नवी उभारी दिली आणि पुन्हा अधिपत्य निर्माण केले. भारताला औद्योगीक दृष्ट्या प्रगत करण्याचे काम त्यांनी केले. बांगला देशाची निर्मिती त्यांच्या पुढाकाराने झाली. १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम करताना गरीब मानसाला बँकींग व्यवस्थेशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले. दहशतवादाच्या विरुद्ध त्यांनी कायम संघर्ष केला. १९८० च्या दशकात त्यांनी पंजाबातील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आॅपरेशन ब्लू स्टार केले. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. खलीस्थानची चळवळ त्यांनी मोडून काढली असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवनातील विविध पैलूंवर आव्हाड यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात आ. अमर काळे व मित्रपरिवारांच्यावतीने रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. व्याख्यान मालेचे प्रास्ताविक आ.अमर काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश गोहाड यांनी केले. या कार्यक्रमाला आर्वी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेकरिता अमर काळे मित्र मंडळाच्या सदस्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधी