हिंदू बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सण दिवाळीला प्रारंभ झाला आहे. सर्वत्र पणत्यांचा मिनमिनता प्रकाश, विद्युत दिव्यांची लख्ख रोषणाई, सर्वत्र चहलपहल आणि धनिकांची लगबग सुरू आहे. अशात काही कुटुंबांना मात्र उद्या आपला व्यवसाय होणार की नाही, हीच चिंता असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्यात दाखल झालेली ही कुटुंबे जीवाचे राण करीत शनिवारी विविध ठिकाणी वस्तूंची विक्री करताना आढळत होती. या भटकंती आणि संघर्षमय जीवनात त्यांच्या चिमुकल्यांची मात्र आबाळ होत असल्याचे चित्रही पाहावयास मिळाले. आर्थिक विषमतेची ही रूंदावत चाललेली दरी अरूंद करण्यासाठी समाज व शासन पुढाकारच अगत्याचा ठरतोय.
चिमुकल्यांचीही होते आबाळ
By admin | Updated: October 30, 2016 00:50 IST