शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

उदरनिर्वाहासाठी होते २४ किमी पायपीट

By admin | Updated: March 30, 2015 01:42 IST

गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही.

लोकमत  मदतीचा हातसचिन देवतळे विरूळ (आ़)गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही. म्हातारपणात आपल्या मुलांकडून दोन वेळचे जेवण मिळावे, एवढीच अपेक्षा घेऊन अनेक वृद्ध माता-पिता जगत असतात; पण म्हातारपणात सोबतीला कुणीच नसेल तर पोटाची खळगी भरण्यासाठी असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. अशाच ८० वर्षीय वृद्ध दाम्पत्याला उदरनिर्वाहासाठी २४ किमीची पायपीट करावी लागत असल्याचे समोर आले आहे़दहेगाव येथील खुशाल धकाते (८०) व त्यांची वृद्ध पत्नी छबू धकाते (७०) या दाम्पत्यांना मुल नाही. दोन मुली होत्या. यात एका मुलीचे निधन झाले तर दुसऱ्या मुलीचे लग्न झाले; पण नवरा सतत मद्यधुंद अवस्थेत मारहाण करीत असल्याने ती दहेगावला आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या आधाराने जीवन जगत आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य, राहायला लहानसे घर असले तरी एवढ्या कुटुंबाचा भार ८० वर्षीय खुशाल यांना पेलावा लागतो़ संसाराचा गाडा हाकण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याची सकाळी ४ वाजतापासून पायपीट सुरू होते. खुशाल व पत्नी छबू हे दहेगाव येथून १२ किमी पायदळ प्रवास करून दोघेही डोक्यावर मोळी घेऊन काठीच्या आधारे थरथरत्या अंगाने पुलगावला जातात़ पुलगाव येथे दोघांचीही मोळी १०० रुपयांत विकून ते परत दहेगावला पायदळ जातात. हे दृष्य पुलगाव ते दहेगाव मार्गावर पाहायला मिळते. वार्धक्यामुळे कोणतेच काम होत नाही; पण नाईलाज असल्याने या वयातही त्यांना काम करावेच लागते आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. निराधार वृद्धांकरिता शासनाकडून अनेक चांगल्या योजना राबविल्या जातात; पण या वृद्ध दाम्पत्यांना अद्याप शासनाच्या एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. साध्या निराधार योजनेतील अनुदानही त्यांना प्राप्त होत नाही. निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी अनेकांकडे आपली कैफियत मांडली; पण नेत्यांसह सर्वांनीच त्याकडे पाठ फिरविली. कुणीही त्यांना मदत केली नाही. आज गरज नसलेल्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे; पण या गरीब, वृद्ध दाम्पत्याना निराधार योजनेचा लाभ मिळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल़खुशाल व त्यांच्या पत्नीचे शरीर वार्धक्यामुळे पूर्णत: खंगले आहे. चालणे होत नाही. चालताना थकवा येतो. बसत-बसत पुलगाव ते दहेगाव हा बारा किमी जाणे व परत येणे, हा प्रवास त्यांना डोक्यावर मोळीचे ओझे घेऊन करावा लागतो़ हे दृश्य सर्वांच्या नजरेस पडते; पण कुणीही त्यांच्या मदतीला समोर येताना दिसत नाही़ या वृद्ध दाम्पत्याला कुणीतरी मदतीचा हात देऊन किमान शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे झाले आहे़