शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

‘जगाच्या पाठीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती झाली नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:31 IST

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला या पवित्र भूमीत आपण आलो आहो. ‘चले जाव’चा नारा याच भूमीतून गांधीजींनी देशवासीयांना दिला.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : ‘आॅगस्ट क्रांती दिन चले जाव’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला या पवित्र भूमीत आपण आलो आहो. ‘चले जाव’चा नारा याच भूमीतून गांधीजींनी देशवासीयांना दिला. अहिंसेच्या माध्यमातून लोकशक्ती निर्माण करून न्याय, समता, शांती प्रस्थापित करण्यासाठी जीवन समर्पित केले. गांधीजींच्या आवाहनावर प्रचंड शक्तीनिशी देशवासी उभे राहत होते. जगाच्या पातळीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती आजपर्यंत झाली नाही, असे मत जेष्ठ पत्रकार व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.गांधी १५० जयंती अभियानांतर्गत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानद्वारे यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहात आॅगस्ट क्रांती चलेजाव अमृतवर्ष सभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा.म. गडकरी उपस्थित होते. गांधीजींच्या प्रतिमेला द्वादशीवार यांनी सूतमाळ अर्पण केल्यानंतर खादी शाल, सूतमाळ व खादी वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.द्वादशीवार पूढे म्हणाले की, स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण आयुष्य मावळ्यांना सोबत घेऊन महाराज लढले. लढत राहिले; पण महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी राजेही १७ वर्षे औरंगजेबाशी लढले. ते फक्त शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमुळेच! जगाच्या इतिहासानेही याची दखल घेतली. १९४२ चा लढा हा सर्वात मोठा होता. सबंध देश एकजूट झाला होता. प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी मरायला तयार होता आणि या मागे गांधीजींची पे्ररणा, शक्ती होती. कुठलाही अधिकार नाही, सत्ता नाही, नंगा फकीर होते; पण लोकांचा प्रचंड विश्वास गांधीजींवर होता. यामुळेच अहिंसेचे तत्त्व आंदोलनात दिसते. गांधीजींचे जीवन तत्त्व व मूल्यावर आधारित होते. यामुळे अहिंसेची लोकशक्ती यशस्वी झाली.सावरकर अंदमानात असताना त्यांच्या मुक्ततेसाठी गांधीजींनी प्रयत्न केले. शत्रूशी मैत्री करण्याची शिकवण बापूंनी कार्यकर्त्यांना दिली; पण सावरकरांनी गांधीद्वेष कायम जपला. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली होती. ती चुकीची होती; पण कायदा व संविधानाच्या चौकटीत. हल्लीच्या सरकारमध्ये ते मूल्य दिसत नाही.सरकार टोळीप्रमाणे कार्य करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या मागे तरूण वर्ग होता. हा वर्ग विचार, मूल्य आणि कृतीवर प्रेरित झाला होता. आज गांधीजींचे विचार, मूल्य तरूणांपर्यंत पोहोचविलेच जात नाही. यामुळे तरूण गांधी विचारांपासून दूर आहे. आश्रम व परिसराचे विचार व मूल्य जपण्याचे दायित्व आहे. महान आत्म्याचे स्मरण या दिवशी सर्वांना प्रेरणा ठेणारे ठरेल, असेही ते म्हणाले.प्रास्ताविक जयवंत मठकर व संचालन प्रशांत गुजरकर यांनी केले तर आभार डॉ. सोहम पंड्या यांनी मानले.