शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:09 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला.

ठळक मुद्देरामदास तडस : स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला. काँगे्रेसने सहा दशकापेक्षा अधिक काळ सत्ता भोगली; पण आमचा तालुका उपेक्षितच राहिला शहरात एक मोठा उद्योग होता. त्याची मुरमुºयाच्या भावात विक्री करून कामगारांना रस्त्यावर आणले. या शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा, स्मशानभूमीसह तहसीलचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. पुलगाव-आमला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेलाईनमध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्याचे लवकर काम सुरू होईल, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेतील स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. उद्घाटक म्हणून म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीतल संजय गाते, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष केशव दांडेकर, म.रा. सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू, जेठानंद राजपूत हिंगणघाट, जयंत तलमले, विजय निवल, संस्थेचे अध्यक्ष सुरेश गणेशपुरे, उपाध्यक्ष प्रदीप पांडे आदी उपस्थित होते.देशातील सहकार क्षेत्रातील सम्राटांनी सहकार क्षेत्राचा दर्जा उंचविण्यापेक्षा दर्जा घसरविण्याचे काम केले. यामुळे आज देशातील सहकार चळवळ आजारी पडली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणारे सहकारी पतसंस्थेतील सभासद, संचालक, कर्मचारी व समाज हे सहकारी पतसंस्थेचे चार खांब आहेत. या चारही खांबांवर पतसंस्थेची इमारत उभी असते. सर्वसामान्य माणूसही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सहकारी पतसंस्थांकडे अधिक वळतो. सहकारी चळवळ मजबूत करून ती तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार क्षेत्राला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची, त्यांच्या त्यागाची गरज आहे. आजच्या तरूण पिढीने त्यांचे विचार व त्याग आत्मसात करून पतसंस्थांनी खातेदार व सभासदाचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे मत म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.खा. तडस व ना. चरेगावकर यांचा पतसंस्थेद्वारे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुनीता महिला बचत गट, शोभा महिला बचत गट, अर्चना महिला बचत गट व मीना महिला बचत गटांना खा. तडस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर तडस यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयासाठी खासदार फंडातून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर ओक यांनी केले. मान्यवरांचा परिचय अजय बोबडे यांनी करून दिला. वैशाली पोहरे यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शैलजा सुदाम यांनी केले तर आभर व्यवस्थापक विजय साकरे यांनी मानले. कार्यक्रमालीा अशोक पनपालिया, नितीन बडगे, विरेंद्र धोपाडे, बबन बरवड, डॉ. प्रकाश हणमंते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.