शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

उपवनसंरक्षक कार्यालयात ‘शिवाजी’ची माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:53 IST

सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे.

ठळक मुद्देवाघ बेपत्ता प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर उलगडले सत्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे. शिवाय तो बेपत्ता असल्याचा विषय ‘लोकमत’ने २६ फेबु्रवारीला ‘बाजीरावशी झुंज देणारा शिवाजी बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्तप्रकाशित करून उजेडात आणला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी हा वाघ नेमका कुठे आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.शिवाजी नामक वाघाचे दर्शन २०१२ मध्ये गरमसूरच्या पलीकडील जंगलात काही नागरिकांना झाले होते. शिवाय, तो वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरातही कैद झाल्याचे बोलले जाते. असे असले तरी हा वाघ मागील काही वर्षांपासून बेपत्ताच आहे. परिणामी, त्याचे वास्तव्य सध्या कुठल्या परिसरात आहे किंवा त्याची शिकार तर झाली नाही ना, असे अनेक प्रश्न वन्यजीव अभ्यासकांकडून सध्या उपस्थित केले जात आहे. २६ फेब्रुवारी २०१९ ला प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते विकास दांडगे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी उपवनसंरक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. तेव्हा उपवनसंरक्षक कार्यालयात टी-४ शिवाजी नामक वाघाची माहितीच नसल्याचे पुढे आले आहे. तसे लेखी पत्रही ३१ मे २०१९ रोजी उपवनसंरक्षकांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.शिवाय पुढील कार्यवाहीसाठी पत्राची एक प्रत विभागीय वन अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांना पाठविण्यात आली आहे. पुढे हे प्रकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.२०१२ नंतर दर्शन नाहीचबोर अभयारण्याला बोर व्याघ्र प्रकल्प म्हणून २०१४ मध्ये घोषित करण्यात आले. त्यावेळी वाघांची सहज ओळख पटावी म्हणून त्यांना नावही देण्यात आली. त्यावेही अंबिका नामक वाघिणीला बीटीआर टी-१, बाजीराव नामक वाघाला बीटीआर टी-२ तर कॅटरिना नामक वाघिणीला बीटीआर टी-३ असे नाव देण्यात आले. शिवाय, शिवाजी नामक वाघाला बीटीआर टी-४ नाव देण्यात आले होते. परंतु, सध्या त्याची नोंदच नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय २०१२ पासून त्याचे दर्शनही झाले नसल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :Tigerवाघ