शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३० दिवस लोटूनही कृपलानीच्या अवैध कामांवर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:57 IST

केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कृपलानी बंधूंनी सुरू केलेल्या अवैध हॉटेल बांधकामावर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. पालिकेने हे संपूर्ण बांधकाम अवैध असल्याचे सांगून ३० दिवसात हे बांधकाम तोडण्याबाबत नोटीस बजावला होता. परंतु, अजूनही न.प.ने कारवाई केली नाही. न.प. प्रशासन सुस्त का? असा सवाल अखिल भारतीय वीरशैव संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देनगर पालिका प्रशासन सुस्त : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कृपलानी बंधूंनी सुरू केलेल्या अवैध हॉटेल बांधकामावर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. पालिकेने हे संपूर्ण बांधकाम अवैध असल्याचे सांगून ३० दिवसात हे बांधकाम तोडण्याबाबत नोटीस बजावला होता. परंतु, अजूनही न.प.ने कारवाई केली नाही. न.प. प्रशासन सुस्त का? असा सवाल अखिल भारतीय वीरशैव संघटनेने केला आहे.या संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार यांनी १५ डिसेंबरला या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून याप्रकरणी लक्ष घालण्याबाबत विनंती केली आहे. केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मिटर क्षेत्र हे शांतता झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. संस्थेच्या परिसरात अवैध हॉटेल सुरू करण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या हॉटेल मालकाचा सेलडोह नजीक नागपूर जिल्ह्याच्या सिमेत वडगाव येथे बार आहे. या परिसरात हॉटेल सुरू झाल्यास या परिसरातील सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरातील रहिवाशांनाही याचा त्रास वाढणार आहे. केसरीमल कन्या शाळेच्या प्रशासनाने याबाबत पालिका व जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले;पण त्यावरही काहीच कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष.जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावापालिका प्रशासनाच्या आशिर्वादामुळे कृपलानी बंधूचे अनेक अवैध बांधकाम शहरात उभी राहीली आहे. पालिकेची यंत्रणा कृपलानीच्या खिश्यात असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी नाशिक शहरातील अवैध अतिक्रमण हटविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच आपला अधिकार वापरून कृपलानीचे बांधकाम तोडावे, अशी मागणी या भागातील शंभर नागरिकांनी केली आहे. या अतिक्रमणाला अभय दिल्या गेल्यास लवकरच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे, अशी माहिती पट्टेवार यांनी निवेदनातून दिली आहे.अवाढव्य जनरेटरमुळे प्रदूषणचा प्रश्न ऐरणीवरकृपलानी बंधूनी येथे अवैध हॉटेल बांधकाम पालिकेच्या नोटीसनंतरही सुरूच ठेवले आहे. या बांधकामाजवळील नाली उघडी करण्याबाबत सूचना केल्यानंतर थातूर-मातूर नाली उघडी करण्यात आली. टायर दुकानासमोरील रॅम अजूनही कायम आहे. त्याखाली नाली आहे, येथे तयार होत असलेल्या हॉटेलसाठी मोठे जनरेटर लावण्यात आले आहे. यात याचा धुर तसेच हॉटेलच्या स्वयंपाकघरातील चिमणीचा धुर यामुळे सुदामपूरी भागातील नागरिकांच्या जिवीतास प्रदूषणाचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पट्टेवार यांनी या निवेदनात म्हटले आहे. अवैधरित्या महावितरण कंपनीने रस्त्यावरच विद्युत डिपी उभी करून कृपलानीच्या हॉटेलला विद्युत पुरवठा केला आहे. सुदामपुरी भागात सुरुवातीपासूनच तीन विद्युत डिपी उपलब्ध आहे. नवीन डिपीची कुठलीही मागणी नागरिकांनी केली नसताना कृपलानीसाठी विशेष डिपी महावितरणने मंजूर केली आहे. यामुळे विजेच्या ११ केव्ही पुरवठ्यापासूनही नागरिकांच्या जिवीताला धोका आहे.