शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात ३५ ग्रामपंचायती झाल्या हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:09 IST

उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे.

ठळक मुद्देसहा ग्रा.पं. वर लक्ष : २६ हजार वैयक्तीक शौचालयाचे झाले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रबोधनही केले जात आहे. सध्या तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या असून उर्वरित सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे.तालुक्यातील ४१ ग्रा.पं.पैकी ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर ६ ग्रा.पं.ची लोटामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्यास्थितीत एकूण २६ हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांना गावकºयांनी प्रतिसाद दिला आहे. शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी १२ हजार रूपयाचे अनुदान दिल्या जात आहे. यात खड्डा खोदकाम करून बांधकाम करण्यापर्यंत दोन टप्पे आहे. गत तीन वर्षापासून यासाठी सतत परिश्रम घेण्यात येत आहेत. उघड्यावर शौचास बसल्याने गावाचा दर्शनी भाग पूर्णपणे घाणेनी व्यापला जायचा. शिवाय नाकाला रूमाल लावून तितका मार्ग पार करावा लागत असे. उघड्यावर शौचास बसल्यास गावात रोगराईला आमंत्रण मिळत असल्याने शासनाने हागणदारीमुक्त गाव ही मोहीम प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले. तालुक्यात डोअर टू डोअर भेटी देवून पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल मरबड व सर्व ग्रामसेवकांनी लोकांना शौचालयाचे महत्व पटवून दिले. त्यांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनाही हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पटल्याने गावकरी सुद्धा या उपक्रमात सक्रीय झाले. याचाच परिणाम म्हणजे तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. कुणी उसनवारीने तर कुणी दागीने गहाण ठेवून शौचालये बांधली. सध्या तालुक्यातील केवळ सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त होणे बाकी असून त्यासाठी प्रयत्न सूरू आहे.सभा घेऊन पटवून दिले शौचालयाचे महत्त्वस्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त गाव या उपक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.गावात उघड्यावर शौचास बसणाºयांना समज देण्यात आली. जनजागृती करून भेटी व सभा घेतल्या. त्यामुळे यश मिळाले आहे. सध्यास्थितीत ३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.- अनिल मरबडगटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).