शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत तब्बल २.२४ लाख दुचाकींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:52 IST

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देवाहनांची एकूण संख्या ३ लाखांच्या घरात : नियमांची मात्र नेहमीच पायमल्ली

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे. यात दुचाकींची संख्या तब्बल २ लाख २४ हजार ५८३ इतकी आहे. विशेष म्हणजे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या वर्षभरात वाहन संख्येमध्ये तब्बल २५ हजार ६३९ वाहनांची भर पडली आहे.प्रादेशिक परिवहन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. मागील वर्षभरात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ यात दुचाकीच्या संख्येत २१ हजार ४७३ ने वाढ झाली आहे. चार चाकी वाहनांची संख्या १७ हजार ६२५ च्या वर पोहोचली असून त्यात या वर्षात २० हजार ४४ वाहनांची भर पडली. कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलीव्हरी व्हॅनच्या संख्येत वाढ झाली आहे. स्कुल बस, रुग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, ट्रॅक्टर, मालवाहू वाहनांची विक्री मागील वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. शहरात आॅटो रिक्षांची संख्या ५ हजार ३५ असून १७० ने भर पडली आहे. मिनीबस, स्कूल बस, रुग्णवाहिका, ट्रक, ट्रॅक्टर, डिलेव्हरी व्हॅन, ट्रेलर आणि इतर वाहनांची संख्या २३ हजार १६३ आहे. यात यावर्षी १ हजार ९४६ वाहनांची भर पडली आहे.वाहनांची नोंदणीपूर्वी वाहनांची संख्या २ लाख ४५ हजार १३५ होती यात दुचाकी २ लाख ६ हजार ११०, चारचाकी १५ हजार ५८९, इतर वाहने २६ हजार ४४४, या वर्षात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८, वाहनांची संख्या २५ हजार ६३९ यात दुचाकी २१ हजार ४७३, चारचाकी २ हजार ४४, इतर वाहने २ हजार ११६.नियमांबाबत उदासीनताचशहरात वाहनांची संख्या कमालिची वाढत असली तरी वाहतूक नियमाच्या अंमलाकरिता चालकांत मात्र कमालीची उदासिलता आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी आहे.