शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

मग, सर्वत्र दारूचा महापूर कसा!

By admin | Updated: November 29, 2015 02:49 IST

जिल्ह्यात पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील प्रत्येक गावात दारूचे पाट वाहत आहेत.

दारूबंदी महामंडळाचा मोर्चा : पोलीस अधीक्षकांना महिलांचा थेट सवालवर्धा : जिल्ह्यात पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील प्रत्येक गावात दारूचे पाट वाहत आहेत. जर पोलिसांच्यावतीने कारवाई होते तर मग, जिल्ह्यात दारूचा महापूर कसा, असा सवाल दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी शनिवारी शहरातून काढलेल्या मोर्चातून थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना केला. जिल्ह्यात दारूबंदी असताना दारूचा व्यवसाय तेजीत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शिवाय विषारी दारूच्या सेवनाने मृत्यू झाल्याची चर्चा आता जिल्ह्यात नित्याचीच झाली आहे. या प्रकाराकडे पोलीस विभागाचे लक्ष वेधण्याकरिता जिल्ह्यात एकूण १२ महिला दारूबंदी मंडळाच्या सदस्यांनी शहरातील शिवाजी चौक येथून मोर्चा काढला. हा मोर्चा मुख्य मार्गाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पोहोचला. येथे मोर्चातील सदस्यांना न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ अडविण्यात आले. मोर्चात सहभागी महिलांना किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, आम आदमी पार्टीचे मंगेश झाडे, सत्यशोशक महिला प्रबोधनिच्या प्रा. नुतन माळवी यांनी मार्गदर्शन केले. शहरातून निघालेल्या या मोर्चात महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात अनेक घोषणा दिल्या. त्यांनी पोलिसांनी दारूविक्रेत्यांकडून हप्ते कमी करा, रेड अधिक करा, यासह अनेक नारे देत परिसर दणाणून सोडला. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वाराजवळ पोहोचला असता सहभागी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक काही कारणास्तव बाहेर असल्याने वर्धेचे उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मोर्चा थांबलेल्या स्थळी येत महिलांकडून विविध मागण्यांचे निवदेन स्वीकारले. यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी दारूबंदीकरिता विशेष मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनावर हा मोर्चा विसर्जित झाला. (प्रतिनिधी)