शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्याच्या जाळीतच त्यांचे आयुष्य

By admin | Updated: August 9, 2014 01:45 IST

तळेगाव (श्या.पंत): पिढ्यान्पिढ्या प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्रयात जगत आहे.

तळेगाव (श्या.पंत): पिढ्यान्पिढ्या प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा विदर्भातील भोई समाज पराकोटीच्या दारिद्रयात जगत आहे. नदीपात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात असताना उद्याच्या पिढीला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणार कधी, असा प्रश्न या समाज बांधवांना पडला आहे.बारा बलुतेदारानंतर अठरा अलुतेदारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भोई समाज. या समाजाला इतिहास मोठा आहे. पूर्वीच्या काळी राजेवाड्यात पालखी वाहण्याचा मान भोई समाजाला होता. आजही अनेक राज्यात मंदिरातील पालखी भोई समाज बांधवांचा हात लागल्या शिवाय पुढे जात नाही. वेदकाळापासून स्वातंत्र्यपूर्व काळात लोकोपयोगी समाज म्हणून या जमातीकडे पाहिले आहेत. भोई जमात सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतीय नागरिकत्व असताना एका राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळतात तर दुसरीकडे नोकरी, शिक्षण क्षेत्रात टिकाव न लागणाऱ्या विमुक्त भटक्या जमातीच्या सवलती दिल्या जातात. आज ओरिसा, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात या समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळते. परंतु महाराष्ट्रात हा समाज या सवलतीसाठी शासनाची पायरी झिझवत आहे. १९४७ नंतर भटक्या विमुक्त जमातीच्या सवलतीमिळूनही त्याचा लाभ मात्र मिळाला नाही.भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय आज संकटात आला आहे. कमी पर्जन्यमानामुळे नदी-नाले तलावातील पाण्याची पातळी पूर्णत: घटली आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्यामागास भोई समाज मासेमारीचा व्यवसाय करून जगत आहे. काही वर्षांपूर्वी गावाकडील नद्यांना बारमाही पाणी राहत असे. त्यावेळी मासेमारी व्यवसायातून उत्पन्न व्हायचे. आता तलाव, नदी कोरडे पडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मासेमारी हा व्यवसाय डबघाईस आला आहे. पूर्वी या समाजातील व्यक्ती कापसापासून सूत करून त्यापासून मासळीचे जाळे विणण्याचे काम करीत होता. पकडलेले मासे ताजे रहावे यासाठी बांबूपासून तयार केलेली धुटी पाठीवर ठेवून त्यात मासे ठेवत असे. कालांतराने नायलॉनचे रेडीमेड महागडे जाळे बाजारपेठेत विक्रीस आल्याने जाळे विणण्याचे कामही बंद पडले आहे. या जाळ्यांच्या किमती अधिक असल्याने अडचण येते. या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अल्प असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वाढली आहे. जीवनमान उंचवण्यासाठी मत्स्य व्यवसाय संस्थेची निर्मिती झाली. परंतु पाणीच नसल्याने त्या कुचकामी ठरल्या आहेत. एकीकडे माशाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तर दुसरीकडे या व्यवसायात कंत्राटदार मोठ्या प्रमाणात शिरल्याने या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने या समाजाला सुविधा देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)