शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण वाघ आठवणीचा पक्काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या कॅमेऱ्यांमध्ये हा तरुण वाघ कैद झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ नदी-नाल्यांच्या काठाने पवनार ते आंजी (मोठी) शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या तरुण वाघाने यू-टर्न घेत पुन्हा पवनार शेतशिवार गुरुवारी पहाटेच्या सुमारास गाठले आहे. ज्या ठिकाणी त्याने पूर्वी शेतात बांधून असलेल्या कालवडीची शिकार केली त्याच ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास या वाघाने येत पुन्हा कालवड ठार केली. आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या कॅमेऱ्यांमध्ये हा तरुण वाघ कैद झालेला नाही. शिवाय गस्त घालत असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही गुरुवारनंतर त्याचे दर्शन न झाल्याने पवनारसह परिसरातील ग्रामस्थांना वनविभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सात ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर-    नैसर्गिक अधिवासाचा शोध घेत असलेल्या या तरुण वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वनविभगााच्यावतीने आवश्यक सात ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या कॅमेऱ्यांत हा तरुण वाघ कैद झालेला नाही. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पवनारसह परिसरातील नागरिकांना वनविभागाच्यावतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय वनविभागाच्या तीन चमू वाघाच्या मागावर आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ