शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणारा जावई कारागृहात करेल सक्तमजुरी; न्यायालयाने दंडासह ठोठावला दहा वर्षांचा सश्रम कारावास

By महेश सायखेडे | Updated: December 14, 2022 18:42 IST

वर्धा न्यायालयाने अल्पवयीन साळीवर मातृत्व लादणाऱ्याला दंडासह दहा वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला.  

वर्धा : चक्क एक महिना अल्पवयीन साळीचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करीत तिच्यावर थेट मातृत्व लादण्यात आले. साळी-जावई या नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकरणातील आरोपी जावयास वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दोषी ठरवून त्यास दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अल्पवयीन साळीचे शारीरिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधम जावयास न्यायाधीशांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) (एफ) अन्वये दहा वर्षांचा सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पीडितेला तिच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने नियमानुसार नुकसान भरपाई देण्याचेही आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला दिले आहे.बॉक्स

उपचारासाठी गेली होती बहिणीच्या घरीदहावीचे शिक्षण घेणारी पीडिता ही प्रकृती ठीक राहत नसल्याने तज्ज्ञांकडून औषधोपचार घेण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून पीडिता ही तिच्या मोठ्या बहिणीकडे राहायला गेली होती. तर आरोपीने जिवे मारण्याची धमकी देऊन पीडितेचे वेळोवेळी शारीरिक शोषण केले.

गर्भवती बहीण झोपायची बाहेरील खोलीतपीडितेची बहीण गर्भवती झाल्याने ती बाहेरच्या खोलीत झोपत होती. तर पीडिता व पीडितेचे जावई हे घरातील स्वयंपाक खोलीत झोपत होते. याच दरम्यान, नराधम जावयाने साळीचे वेळोवेळी शारीरिक शोषण केले; पण सुरुवातीला त्याची साधी माहितीही पीडितेच्या कुटुंबीयांनाही झाली नाही.

प्रकृर्ती आणखी बिघडल्यावर फुटले बिंगआरोपीने पीडिताला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तब्बल एक महिना वारंवार अत्याचार केला. अशातच पीडितेची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला तिच्या वडिलांनी घरी आणले. अशातच मासिक पाळी येत नसल्याने तिला नागपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे पुढे आले. डॉक्टरांनी याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना देताच त्यांनाही धक्काच बसला.

गोंडस मुलाला दिला जन्ममुलगी गर्भवती असल्याचे कळताच जणू पीडितेच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. बदनामीच्या भीतीपोटी पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेला गर्भपात करण्यासाठी दुसऱ्या महिला डॉक्टरकडे नेले; पण डॉक्टरांनी तिचा गर्भपात होऊ शकत नाही, असे पीडितेच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यांनतर पीडिताने नागपूर येथील रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला.बॉक्स

गोंडस बाळाची झाली अनाथालयात रवानगीघटनेच्यावेळी पीडिता ही केवळ १५ वर्षांची असल्याने तिने जन्म दिलेल्या गोंडस बाळाला अनाथालयात देण्यात आले. त्यानंतर संबंधित घटनेची तक्रार पीडितेच्या कुटुंबीयांनी कोंढाळी येथील पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी कारंजा पोलिसांकडे वळते करण्यात आले होते.

१५ साक्षीदारांची तपासली साक्षनात्यालाच काळिमा फासणाऱ्या या गंभीर प्रकरणाचा तपास कारंजा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार अशोक सोनटक्के यांनी काम पाहिले. याप्रकरणी न्यायालयात एकूण १५ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि विविध पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.

  

टॅग्स :Courtन्यायालयwardha-acवर्धा