वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठेवण्यात आलेल्या मोतीबिंदूमुक्त शिबिराच्या कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने येत असतांनाच मुसळधार पाऊस सुरु झाला त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडच न दिसल्याने शिंदेंना माघारी घेत नागपूर येथे जाऊन हेलिकॉप्टर लॅन्ड करून पुन्हा बाय रोड समृद्धी महामार्गाने गाडीने परत वर्ध्याला येणे पडले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम येथील चरखा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड उपस्थित होते. दुपारी १२ वाजता आयोजित केलेला हा कार्यक्रम पावसामुळे अडीच तास उशिरा सुरु करण्यात आला.
उपमुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांना झालेल्या उशिराने कारण सांगत म्हणाले, अरे "मी आताच दोनदा येऊन हॅलो केले. निघतांना पावसास सुरवात झाली. कार्यक्रमस्थळी येताच पाऊस जोरात. हेलिपॅड दिसेना. गोंधळ झाला. पायलट म्हणाला आता उतरणे कठीणच. खाली काही दिसत नाही. परत फिरावे लागणार. मी त्याला धीर देत म्हणालो प्रयत्न तर करून बघ त्यावर पायलट म्हणाला प्रयत्न अंगलट येऊ शकतो." त्यामुळे कार्यक्रमापेक्षा शिंदेंना दोनदा घडलेल्या वर्धा भेटीचीच जास्त चर्चा रंगली.