शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

केंद्र सरकारने लसीच्या बूस्टर डोसची व्याप्ती वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

कोरोनापासून असलेला धोका अजूनही संपलेला नाही. कवच कितीही आधुनिक असले तरी युद्धात शस्त्र खाली ठेवता येत नाही. यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थांनी व केंद्र सरकारने बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाविरुध्द लढाईमध्ये बूस्टर डोस दोन लसीकरण झालेल्या सर्वांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात जगातील सर्वात लसीकरण मोहीम देशात सुरू असून कोरोनाविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत प्रतिबंधक लसीचे १५० कोटींपेक्षा जास्त डोस देण्याचा मैलाचा टप्पा देशाने पार केला. परंतु कोरोनापासून असलेला धोका अजूनही संपलेला नाही. कवच कितीही आधुनिक असले तरी युद्धात शस्त्र खाली ठेवता येत नाही. यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थांनी व केंद्र सरकारने बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाविरुध्द लढाईमध्ये बूस्टर डोस दोन लसीकरण झालेल्या सर्वांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले.  लसीकरण अभियान कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी अभूतपूर्व यश मिळवित आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री, सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, आघाडीवर असलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी बूस्टर डोसची व्याप्ती वाढवावी आणि दोन्ही लसी घेतलेल्या सर्वांना बूस्टर डोस मिळावा यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घ्यावा, अशी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री  मनसुख मांडवीया यांना विनंती केली.  संपूर्ण देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना ज्या लशीचे आधी दोन डोस घेतलेले आहेत त्यांनात तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. परंतु देशातील सर्व नागरिकांना ज्यांनी लशीचे दोन्हीही डोस घेतलेले आहे, त्यांना सुध्दा तिसरा बूस्टर डोस दिला जावा यासाठी लोकसभेचे लक्ष वेधले.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कामांच्या दुरुस्तीकरिता निधीची तरतूद करावी- वर्धा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून  पूर्ण करण्यात आलेल्या कामांचा देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षांचा असतो. पाच वर्षांनंतर सदर काम इतर योजनेत समाविष्ट न झाल्यास रस्ता नादुरुस्त होण्यास सुरुवात होते. त्यामुळे केंद्र शासनाने व राज्य शासनाने एकत्रित येऊन पूर्ण झालेल्या कामांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी. यासाठी खासदार रामदास तडस यांनी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.वर्धा लोकसभा कार्य करीत असताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत पूर्ण झालेल्या रस्त्यांची अवस्था अनेक ठिकाणी खराब झालेली आहे. ग्रामीण रस्ते नादुरुस्त व खराब झाले असल्याने ग्रामीण जनतेला पावसाळ्यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व झालेल्या रस्त्यांची व पुलांची आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे, सदर दुरुस्ती कामे पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून  हा प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यात आला व या माध्यमातून पुढील काळात नागरिकांना न्याय देणे सोपी होईल व ग्रामीण रस्ते विकास कार्याला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी या वेळी दिली.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRamdas Tadasरामदास तडस