शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामवन’ योजनेतून होणार दहा गावे सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:19 IST

जंगलांचे संवर्धन व संरक्षण करता यावे म्हणून वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना ग्रामस्थांकरिता वरदान ठरू लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ‘ग्रामवन’ ही योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देवन विभागाचा उपक्रम : रोपवनातून रोजगार निर्मिती

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जंगलांचे संवर्धन व संरक्षण करता यावे म्हणून वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना ग्रामस्थांकरिता वरदान ठरू लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ‘ग्रामवन’ ही योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून गावे सक्षम तथा स्वावलंबी करण्याचे प्रयत्न वन विभाग करीत आहे. शिवाय वन संवर्धन, संरक्षणाचा उद्देश्यही साध्य केला जात आहे.प्रत्येकाला रोजगार पुरविणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. यामुळे विविध माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून वन विभागामार्फत ग्रामवन योजना राबविली जात आहे. या योजनेतून वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जात आहे. सध्या ही योजना जिल्ह्यातील दहा गावांमध्ये राबविली जात आहे. यात तळेगाव वन परिक्षेत्रातील रगडगाव, कारंजा वन परिक्षेत्रातील मरकसूर, आष्टी क्षेत्रात पांढुर्णा, खरांगणा (मो.) क्षेत्रात उमरी मासोद आणि सहेली, आर्वी अंतर्गत गुमगाव आणि चिंचोली तर समुद्रपूर वन परिक्षेत्रातील ताडगाव व जोगीनगुंफा या गावात ग्रामवन योजनेंतर्गत कामे केली जात आहे. सध्या या दहाही गावांमध्ये रोपवनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येक गावात १० हेक्टर जागेमध्ये रोपवन केले जात आहे. ग्रामवन योजनेसाठी निवड झालेल्या दहा गावांमध्ये खड्डे खोदणे व लागवडीची कामे केली जात आहेत. यासाठी प्रत्येक गावात सुमारे ६ लाख रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे.वन विभागाच्या माध्यमातून या दहा गावांमध्ये अन्य कामेही लवकरच हाती घेतली जाणार आहेत. सदर कामे वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनाच करावयाची आहेत. यातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय अन्य कामांची संधी उपलब्ध होणार आहे. रोपवन तथा अन्य साधनांतून मिळणाºया उत्पन्नातून ग्राम समृद्ध करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामस्थांना गावातच रोजगार मिळावा तथा जंगलांचेही संवर्धन व्हावे म्हणून ही योजना शासनाकडून हाती घेण्यात आली आहे. या योजनेला जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून प्राथमिक कामेही सुरू झाली आहेत. एनआर तथा एफआयसी या कामांसाठी प्रत्येक गावातील वन व्यवस्थापन समितीला सहा लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला असून त्यातून कामे केली जात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.१०० टक्के उत्पन्नाचा लाभ गावांनाचवन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामवन योजनेत दहा गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये रोपवनाची कामे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात १० हेक्टर जमिनीवर हे रोपवन केले जात असून यातून मिळणाऱ्या संपूर्ण उत्पन्नाचा १०० टक्के लाभ त्या गावालाच मिळणार आहे. यातून गावे सक्षम होण्यास मोलाचे सहकार्य मिळणार आहे. या माध्यमातून जंगलांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा उद्देश्यही सफल होणार आहे. वन संवर्धन व संरक्षणाची जबाबदारीही वन व्यवस्थापन समिती तथा तेथील ग्रामस्थांवर सोपविण्यात येणार आहे. रोजगार मिळत असल्याने ग्रामस्थही स्व-खुषीने वनांचे संरक्षण, संवर्धन करतील, असा विश्वास वन विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.दोन ते अडीच वर्षांत जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण कामे करण्यात आली. ग्रामवन योजना ग्रामस्थांसाठी फलदायी ठरणार आहे. वन विभागामार्फत राबविल्या जाणाºया उपक्रमांतून मिळणारे १०० टक्के उत्पन्न त्या गावांचेच राहणार आहे. मोबदल्यात केवळ ग्रामस्थ तथा वन व्यवस्थापन समितीकडून वन संवर्धन व संरक्षणाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे.- दिगांबर पगार, उपवनसंरक्षक, वन विभाग, वर्धा.