शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अभियंत्याला दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:41 IST

स्थानिक महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठ्याचे विद्युत खांब व तार तुटून ४८३ दिवस विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्या प्रकरणी नागपूरच्या विद्युत लोकपालांनी महावितरणच्या अभियंत्यांना दोषी ठरवून थेट दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देविद्युत लोकपालांचा आदेश : दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठ्याचे विद्युत खांब व तार तुटून ४८३ दिवस विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्या प्रकरणी नागपूरच्या विद्युत लोकपालांनी महावितरणच्या अभियंत्यांना दोषी ठरवून थेट दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून सदर रक्कम अर्जदाराला मानसिक त्रास, गैरसोय व लवादाचा खर्चाची भरपाई म्हणून ३० दिवसांच्या आत देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांच्या कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्याचे वीज खांब आणि तार १२ एप्रिल २०१६ ला तुटले. त्याची दुरूस्ती ७ जून २०१७ पर्यंत करण्यात आली नाही. खंडित झालेल्या विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक दोष ४८ तासांच्या आत शोधून तो दूर करणे क्रमप्राप्त आहे. विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सदर शेतकºयाने संबंधितांना वारंवार विनंती अर्ज केला. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. त्यानंतर अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाल्याने याबाबत तक्रार निवारण कक्ष वर्धा यांच्याकडे दाद मागितली. यावर सुनावणी होवून ४८ तासात विद्युत पुरवठा सुरु करण्याचा आदेश झाला. परंतु, नुकसान भरपाईच्या मागणीला विलंब झाल्याचे कारणा पुढे करीत सदर मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने प्रकरण ग्राहक तक्रार निवारण मंच महावितरण नागपूर यांच्याकडे दाखल केले. मंचाने यावर सुनावणी घेऊन प्रकरण मुदत बाह्य असल्याचे दर्शवून प्रकरण खारीज केले. सदर मंचाचा आदेश मान्य नसल्याने अर्जदाराने विद्युत लोकपाल नागपूर यांच्याकडे प्रकरण दाखल केले. त्यावर विद्युत लोकपालांनी सुनावणी घेवून सदरचा निकाल दिला. अर्जदार शेतकºयांची बाजू भीमराव बेताल यांनी मांडली.