शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाने पाडला दहा शेळ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:28 IST

तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपरिसरात दहशत : १.२० लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/कोरा : तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे. नुकसानग्रस्त शेळीपालकाला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. या घटना शनिवारी पहाटे घडली असून सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, धामणगाव येथील शेतकरी वसंतराव आडे यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची जोड दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरा त्यांनी सर्व शेळ्या नेहमीप्रमाणे शेतातील गोठ्यात बांधून ते घराकडे परतले. परंतु, शनिवारी पहाटे याच शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून दहा शेळ्यांना ठार करीत एका शेळीला गंभीर जखमी केले. तर पाच शेळ्यांनी वाघाच्या तावडीतून कसाबसा पळ काढल्याने त्या बचावल्या.या घटनेमुळे शेतकरी आडे यांचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच. एन. नरडंगे, वनरक्षक प्रिया सावरकर, वनमित्र प्रकाश सहारे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे.लोकप्रतिनिधींकडून नुकसानग्रस्तांचे सांत्वनसदर घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य रोषण चौके, पं.स. सदस्य वसंतराव घुमडे यांनी घटनास्थळ गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन केले. शिवाय त्यांनी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे.घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दीवाघाने हल्ला करून दहा शेळ्यांना ठार केल्याच्या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या घटनेमुळे धामणगावसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघ