वर्धा : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत़ या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले़राज्य कृषी विभागातील महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाची तातडची बैठक रविवारी पार पडली़ यात संलग्न ५ केडर संघटनांचे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते़ कृषी विभागातील तांत्रिक संवर्ग कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग - २, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग - १, अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गाच्या मागण्या प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले़ यात कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जावाढ याबाबत मंत्रिमंडळाने २६ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजाणी करावी, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी १ जुलै २००१ रोजी घेतलेला निर्णय रद्द करावा, नैसर्गिक आपतकालीन परिस्थितीत शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी व सहार विभागाचा शासन निर्णय १६ जुलै १९८६ अन्वये निर्धारित केलेल्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, मारहाणीबाबत अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा, ‘शून्य आधारित अर्थ संकल्पात’ कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी निय करावा, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील सर्व पदे १०० टक्के कृषी सहायकातून पदोन्नतीने भरावीत, कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करावी, कृषी सेवकाची ३ वर्षांची सेवा अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरावी, आत्मांतर्गत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्सम भत्ता लागू करावा, साप्ताहिक पेरणी अहवाल कृषी विभागाकडून काढून महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावर पीक पेरा नोंद घेण्याचे अधिकार कृषी विभागाकडे सोपविण्यात यावेत, महसूल व ग्रामविकास विभागाकडून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांवर लादण्यात येणाऱ्या कामांना प्रतिबंध घालावा, कृषी सहायक संवर्गाचे पदनाम ‘सहायक कृषी अधिकारी’ असे करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे पदोन्नती, सरळसेवेने त्वरित भरावीत आदी मागण्या लावून धरण्यात येत आहे़ अधिकारी, कर्मचारी आजपासून आंदोलन करीत असून यात धरण्यांसह अन्य आंदोलनांचा समावेश करण्यात आला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
By admin | Updated: August 12, 2014 00:05 IST