शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
4
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
5
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
6
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
7
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
8
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
9
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
10
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
11
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
12
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
13
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
14
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
15
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
16
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
17
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
18
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
19
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
20
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाचा तडाखा

By admin | Updated: March 23, 2016 02:06 IST

खेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे

श्रेया केने ल्ल वर्धाखेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे वातावरणातील उष्णताशोषक घटकांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. उष्णताशोषक घटकांच्या झालेल्या ऱ्हासामुळेच तापमानात वाढ होत असल्याची बाब निरीक्षणातून वैज्ञानिकांच्या निदर्शनात आली आहे. यातून बचावाकरिता नागरिकांत जागृती निर्माण करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या संदर्भात भारतीय वेधशाळेकडून निरीक्षण नोंदविले जातात. यात निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप हवामान बदलास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या शहरीकरणासह काँक्रिटीकरण झपाट्याने होत आहे. पूर्वी कच्चे रस्ते असायचे. आता झगमगटाच्या नावाखाली शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातूनही कच्चे रस्ते हद्दपार झाले आहे. सर्रास सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. शिवाय घरबांधकामातही सिमेंट, काँक्रिटचा वापर होत आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेत तर मोठ्या इमारती निर्माण होत काँक्रिटचे जंगल तयार होवू लागले आहे. या काँक्रिटीकरणाकरिता झाडांची कत्तल होत असून हिरव्या जंगलाऐवजी सिमेंटचे जंगल वाढत आहे. यामुळे उष्णताशोषक घटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रखर सूर्यकिरणांना शोषून वातावरण शीत राखण्यास मदत करणारे घटक कमी होवून उष्णता परावर्तीत करणाऱ्या घटकांमध्ये वाढ होवू लागली आहे. बदलत्या जीवन शैलीसह वापरात येणाऱ्या विविध साधनांमुळे उष्णतामान वाढविणाऱ्या घटकांत भरच पडत आहे. यासह दळणवळणाची साधने, त्यातून होणारे प्रदूषण, तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यातील वनसंपदा, वनक्षेत्र कायम असले तरीही मानवी वस्तीचा विस्तार होताना त्या परिसरातील झाडांची कत्तल होत आहे. याला पर्याय म्हणून वृक्षारोपण होत असले तरीही त्याची गती मंद आहे. तुलनेने झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम हवामान बदलाच्या स्वरूपात मानवाला भोगावा लागत असून फेब्रुवारी महिन्यातच पारा ३५ अंशापुढे गेला आहे. याविषयी जागरूकता बाळगण्याची गरज असल्याचे मत वैज्ञानिकांनी नोंदविले आहे.४हवामान बदलामुळे मानवासह प्राणिमात्रांना अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील एक म्हणजे ऋतूबद्दल उन्हाळ्यात वाढलेला कालावधी. या सर्व परिणामांपासून निसर्गाचे रक्षण करण्याकरिता जागतिक स्तरावर प्रयत्न होत असून जागरूकता निर्माण करण्यासाठी २३ मार्च हा हवामान दिन म्हणून साजरा केला आहे. शासनस्तरावर हा दिन साजरा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असून याशिवाय प्रत्यक्षात कृती करण्याची गरज वैज्ञानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.वाढते काँक्रिटीकरण उष्णता वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे. मानवी वस्ती व परिसरातून उष्णता शोषक घटक बाद होत असून तापमान वाढीस हे घटक जबाबदार आहेत. एकाएकी तापमान वाढल्याने समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया अधिक गतिमान होते. परिणामी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढून पाऊस पडतो. वेळीअवेळी होणाऱ्या पावसाचे हे देखील मुख्य कारण आहे.- बी. एस. आवळे, सहायक वैज्ञानिक, भारतीय वेधशाळा, नागपूर विभाग, जि. नागपूर.