शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

गृह अलगीकरणातील कोविड बाधितांवर ‘टेलिफोनीक वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच त्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

ठळक मुद्देदररोज भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून डॉक्टर जाणून घेतात रुग्णाच्या प्रकृतीची माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आठ हजाराहून अधिक झाली असली तरी लक्षणविरहित आणि कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील विविध भागात लक्षणविरहित आणि कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या एकूण ३०४ कोविड बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर टेलिफोनीक पद्धतीने वॉच ठेवला जात आहे. गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच त्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

डॉक्टरांची विशेष चमू राहते हायअलर्टवर

 एखाद्या लक्षणविरहित तसेच सैाम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधिताने स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर त्या रुग्णाचे घर होम आयसोलेशनसाठी उत्तम आहे काय याची पाहणी केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला होम आयसोलेशनसाठी रितसर परवानगी दिली जाते. या रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देत त्यास आवश्यक औषधसाठा दिला जातो. इतकेच नव्हे तर तालुका स्तरावर डॉक्टरांची विशेष चमू नेहमीच हायअलर्टवर राहते.

 गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णाला कोविड वॉर रुममधून दिवसातून किमान दोन वेळा वैद्यकीय तज्ज्ञ फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारणा करतात. रुग्णाची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच तालुकास्तरावरील डॉक्टरांची चमू त्यास तातडीने नजीकच्या कोविड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात दाखल करतात. इतकेच नव्हे तर गृहअलगीकरणा विषयीचा आढावा जिल्हाधिकारी स्वत: वेळोवेळी घेतात.

सध्या ३०४ कोविड बाधित होम आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांच्यावर टेलिफोनीक पद्धतीने वॉच ठेवला जात आहे. दररोज त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली जाते. प्रकृती ढासळल्यास रुग्णास रुग्णालयात दाखल केले जाते.- डॉ. अजय डवले,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

जिल्ह्यात ४४९ ॲक्टिव्ह कोविड बाधित रुग्ण रविवारी जिल्ह्यात ४६ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या ८,१४० झाली आहे. तर आज ५३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ४३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला असून जिल्ह्यात सध्या ४४९ ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. त्यांना चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या