शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी दिले मोका पाहणीचे आदेश

By admin | Updated: October 23, 2016 02:27 IST

मदनी येथील १७ शेतकऱ्यांची वहिवाटच बंद झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित केले.

वृत्ताची दखल : मदनीच्या शेतकऱ्यांना रस्ता मिळण्याची अपेक्षाआकोली : मदनी येथील १७ शेतकऱ्यांची वहिवाटच बंद झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त उमटताच तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी मंडळ अधिकारी पी.एस. डेहणे यांना संयुक्त मोका पाहणी करण्याचे आदेश दिले. शिवाय शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्याचेही आदेशित केले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा सेलू तालुक्यातील तामसवाडा व बोरधरण येथे दौरा होता. यानिमित्त तहसीलदार डॉ. होळी काही वेळ आकोली येथील तलाठी कार्यालयात थांबले होते. याप्रसंगी मदनीचे वसंत दिघडे आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ. होळी यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी समस्या सांगितली असता त्यांनी मी ‘लोकमत’ चे वृत्त वाचले. मंडळ अधिकारी पी. एस. डेहणे यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त मोका पाहणी करून त्वरित रस्ता उपलब्ध करून द्यावा. तसेच कायमस्वरूपी रस्त्याची उपाययोजना करावी, असा आदेश दिल्याचे सांगितले. याप्रसंगी मंडळ अधिकारी डेहणे, तलाठी मरस्कोल्हे, नासरे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)