शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नरत असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 23:27 IST

शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे. यामुळेच देशाचे भविष्य उज्वल होईल, असे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले. आंजी (मो.) येथे आयोजित जि.प. शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्दे समीर कुणावार : क्रीडा स्पर्धेत आर्वी पंचायत समिती अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी(मोठी) : शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे. यामुळेच देशाचे भविष्य उज्वल होईल, असे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले. आंजी (मो.) येथे आयोजित जि.प. शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिक्षण व आरोग्य समिती सभापती निता गजाम तर प्रमुख पाहुणे आमदार समीर कुणावार, उप मुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, मेश्राम, पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, सरपंच जगदीस संचेरिया, जि.प. सदस्य धनराज तेलंग, पं.स. उपसभापती सुभाष चांभारे, पं.स. सदस्य राजेंद्र डोळसकर, राजेंद्र राजूरकर, वंदना बावने, उगले, शिक्षणाधिकारी डॉ. इंगोले तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.कबड्डी, खो-खो, लंगडी, १०० आणि २०० मीटर दौड, थाळीफेक, गोळाफेक, लांबउडी, बुध्दीबळ अशा स्पर्धा झाल्या. सामने पाहण्याकरिता क्रीडाप्रेमींची गर्दी होती. बॅँडपथक, कवायत, समरगीत, पोवाडा, नाट्यछटा, नाटीका नृत्य अशा ४ गटात स्पर्धा घेण्यात आल्या. पुढे बोलताना आ. कुणावार म्हणाले, समाजाप्रती आपले देणे लागते. डिजीटल शाळेसह ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रगत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. आकर्षक कवायती सादर केल्या. स्वागताध्यक्ष शिक्षण सभापती जयश्री गफाट यांनी मनोगतात व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेश्राम, जाधव यांनीही मार्गदर्शन केले. सभापती नीता गजाम यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.याप्रसंगी जि.प. शाळा सालफळ येथील संघानी कवायत सादर केली. तर जि.प. शाळा पिंपळखुटा येथील विद्यार्थ्यांनी समुह नृत्य आणि जि.प. शाळा सुलतानपुर येथील चिमुकलीने नाटीका सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांना भरभरून दाद दिली. यानंतर मान्यवराच्या हस्ते विजेत्या संघाना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सर्वाधिक बक्षीस पंचायत समिती, आर्वी ने मिळविले. यासह चॅम्पियन ट्रॉफी आर्वी संघाने पटकावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ. इंगोले यांनी केले. संचालन केंद्रप्रमुख चौधरी तर आभार प्रदर्शन गट शिक्षणाधिकारी कोडापे यांनी केले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कारपुलई येथील जि.प. शाळेतून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळणाºया १३ खेळाडू व शिक्षक प्रफुल इंगोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.स्वच्छ शाळा पुरस्कार प्रदानजि.प. शिक्षण विभागाने स्वच्छ शाळा पुरस्कार योजना सुरू केली असून हा पुरस्कार वर्धा तालुक्यातील सेवाग्राम येथील जि.प. शाळा, हावरे ले-आऊट यांनी मिळविला. द्वितीय पुरस्कार समुद्रपूर पं.स. येथील लाहुरी जि.प. शाळेला प्रदान केला.मोबाईल नाटिकेने जिंकले मनजि.प. शाळा सुलतानपुर येथील विद्यार्थिनी सुहानी भगत हिने मोबाईल, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यांचे वेड लागलेली पिढी यावर मनोरंजनात्मक नाटिका सादर केली. या नाटिकेला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त दाद दिली. समाजमाध्यमांचा परिणाम कसा होतो हे यातून सांगितले.