शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे वेतन थेट खात्यात जमा होणार

By admin | Updated: May 31, 2015 01:32 IST

जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक च उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात जमा करण्याचे ...

जूनच्या देयकात माहिती सादर करण्याचे आदेशवर्धा : जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक च उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात जमा करण्याचे प्रस्तावित असल्यामुळे सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जूनच्या वेतन देयकासोबत माहिती सादर करण्याचे आदेश वेतन पथक कार्यालयाने दिले आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे वेतन दिल्या जात आहे, त्याच धर्तीवर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन थेट खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या विलंबाने होणाऱ्या वेतनाच्या तक्रारीवर लगाम लावता येणार आहे. शिक्षण विभागाच्या २८ मे रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समधील सूचनेनुसार सर्व अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापासूनचे वेतन सीएमपी द्वारे थेट खात्यामध्ये जमा करण्याचे प्रस्तावित आहे.शाळांनी पुढील माहिती लॉगिन करून तपासावयाची आहे. चुकलेली माहिती दुरूस्त करून लेव्हल २ ला फॉरवर्ड करावी. तसेच जून महिन्याच्या देयकासोबत टीडीएसचा चौथा हप्ता, ध्वजनिधी भरल्याची पावती, खाते मान्यता व संच मान्यतेसह विहित मुदतीत माहिती सादर करावयाची आहे. सोबतच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव युडायस क्रमांक, संयुक्त खाते क्रमांक व बँकचे नाव, कपातीचा खाते क्रमांक, जन्मातरीख, वेतन खाते क्रमांक व बँकेचे नाव इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्रशालार्थ प्रणालीमध्ये संपूर्ण माहितीची नोंद करून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना थेट खात्यात वेतन अदा करण्यास अडचण नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. यात चूक झाल्यास सर्वस्वी जबाबदार मुख्याध्यापक राहील असे वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) यांनी दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात जमा करण्याच्या या निर्णयाचे विमाशी संघाने स्वागत केले आहे.