वर्धा : नवीन वेतन प्रणाली लागू झाली त्या काळापासूनच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्यावतीने शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षणधिकारी व शिक्षण विभागाच्या इतर अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एप्रिल महिन्यापासून शिक्षकांचे वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत करण्यात येईल या लेखी आश्वासनावर माघार घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गत दोन तीन महिन्यांपासून आनागोंदी पसरली आहे. या विरोधात शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता असलेल्या जिल्ह्यातील विविध संघटनांनी मुख्यकार्यपालन अधिकारी व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढण्याची मागणी केली; मात्र त्यावर काहीच तोडगा निघाला नाही. मार्च महिना उजाडला जरी शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन मिळाले नाही. शिवाय इतर समस्यांही डोके वर काढत आहेत. यावर मार्ग काढण्याकरिता शिक्षक समितीच्यावतीने शिक्षण विभागाला नोटीस देत यावर मार्ग काढण्याची मागणी केली होती. त्याचवेळी याकडे मागण्यांकडे दुर्लक्ष जि.प. प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही दिला होता. यात शिक्षण विभागाच्यावतीने काहीच कार्यवाही करण्यात आली नाही, यामुळे समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
शिक्षकांची झेडपीवर धडक
By admin | Updated: March 8, 2015 01:48 IST