शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाच्या रकमेतून कर्र्जाची कपात

By admin | Updated: May 12, 2016 02:27 IST

शासकीय अनुदानातून कर्जाची कपात करू नये असे शासन निर्देश आहे.

आकोली : शासकीय अनुदानातून कर्जाची कपात करू नये असे शासन निर्देश आहे. असे असतानीही सुकळी (बाई) येथील बॅँक आॅफ इंडियाचे कर्मचारी निराधारांच्या मदत राशीतून व घरकुलकरिता मिळालेल्या अनुदानातून कधीकाळी उचललेल्या कर्जाची कपात करीत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे. अनेक गरजू नागरिकांसाठी निराधार योजना ही आधार ठरत आहे. ग्राहकांना गरजेनुसार कधीकाळी कर्ज घ्यावे लागते. पण त्यांच्या कर्जाची थकित रक्कम त्यांना मिळत असलेल्या अनुदानातून बँकेत जमा केली जात आहे. लाभार्थ्यांचे विड्रॉल फॉर्म भरून पासबुक देताच बॅँकेचा कर्मचारी स्वहस्ताक्षरात पैसे जमा करण्याची स्लिप भरतो व लाभार्थ्यांच्या हाती पासबूक थोपवून त्याला घराचा रस्ता दाखवत असल्याचे प्रकार घडत आहे. भाऊराव यशवंत इंगोले रा. मदना या निराधार लाभार्थ्याला दिवाळीपासून रोख रक्कमच देण्यात आली नाही. त्यांनी बँकेतून यापूर्वी कर्ज घेतले होते. त्यामुळे प्रत्येकवेळी पैसे जमा करण्याची पावती भरून अनुदान कर्जात कपात करण्यात आल्याने त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. त्याचप्रकारे सुकळी (बाई) येथील वासुदेव गळाके यांना प्रतीक्षा यादीप्रमाणे शासनाने घरकूल मंजूर केले. रोजमजुरी करणाऱ्या वासुदेवने नातेवाईकांकडून उसणवार घेवून बांधकाम सुरू केले. पहिला हप्ता बॅँकेत जमा होताच ५ हजारांची व दुसरा हप्ता जमा होताच ८ हजार रूपयांची कपात करण्यात आली. त्यांनी पंक्चर दुरूस्तीच्या दुकानासाठी १२ हजाराचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड बँकेने या रकमेतून परस्पर करून घेतली. त्यामुळे आता अर्धवट घर कसे बांधावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेवून न्याय देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)