शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सेलू पंचायत समितीवर पुन्हा झाकली ताडपत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:49 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे.

ठळक मुद्देइमारत कोसळण्याच्या स्थितीत : कर्मचारी जीव मुठीत घेऊन करतात काम

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे. ६२ ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावाच्या विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करणारे कार्यालय म्हणून असलेल्या पंचायत समितीवर जबाबदारी आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीतून गाव विकासाचे निर्णय घेणारे लोक प्रतिनिधी दर मासिक सभेला येतात. या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा आहे. एका गावासाठी कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगणारे लोकप्रतिनिधींचे या इमारतीकडे दुर्लक्ष करून आहेत.गत काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की या इमारतीच्या छतावर ताडपत्री झाकली नाही तर इमारतीत असणारे महागडे उपकरणे भिजल्या शिवाय राहत नाही. गळती लागणारे कार्यालय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे गत चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पाहता बुधवारी या कार्यालयावर ताडपत्री टाकण्याचे काम सुरू आहे . दरवर्षी ताडपत्री टाकली जात असली तरी या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्या असून याला भेगा गेल्या आहे जीव मुठीत घेऊन कर्मचारी आपले कामकाज उरकवित आहे. जीर्ण इमारतीऐवजी किरायाच्या इमारतीतून कार्यालय चालविण्याची वेळ काही दिवसात येणार आहे.