शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसानंतर येणार नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:35 IST

पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले.

ठळक मुद्देजलवाहिनी फुटल्याचा परिणाम। दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले. याच जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम आता अंतिमटप्प्यात आले असून मुख्य जलवाहिनी फुटल्याच्या घटनेमुळे नागरिकांना तीन दिवस उशीराने नळ योजनेद्वारे वर्धा न.प. प्रशासन पाणी पुरवठा करणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकारी सांगितले.नालवाडी भागात मुख्य जलवाहिनी सोमवार ६ मे रोजी अचानक फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. सदर घटना लक्षात येताच वर्धा न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. सध्या हे दुरूस्तीचे काम अंतीम टप्प्यात आले असून दुरूस्तीचे काम शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत पूर्णत्त्वास जाणार आहे. दुरूस्तीचे काम अवघ्या दोन दिवसात पूर्ण होईल असा अंदाज असताना त्याला सहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच न.प.द्वारे केल्या जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून वर्धा शहरातील ज्या भागातील नळांना रविवारी पाणी येणार होते ते आता तीन दिवसानंतर येणार आहे. तसेच इतर भागातील नळालाही तीन दिवसा उशीरानेच पाणी येणार आहे. परिणामी, नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन वर्धा न.प.च्यावतीने करण्यात आले आहे.आठ टँकरद्वारे पाणीपुरवठामुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी समस्या भीषण रुप धारण करू पाहत होती. त्यावर मात करण्यासाठी न.प. प्रशासनाने सोमवारनंतर शहरातील काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. शुक्रवारी एकूण आठ टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. एका टँकरने सुमारे चार फेऱ्या मारल्याची नोंद न.प.ने घेतली आहे.खंडित होणारा विद्युत पुरवठा ठरतोय डोकेदुखीशनिवारी वर्धा शहरातील काही भागातील नागरिकांना पाच टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु, खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात असला तरी खासगी टँकरवर होणारा खर्च लाखाच्या आत कसा ठेवता येईल यावर पालिका प्रशासन लक्ष केंद्रीत करून आहे.

टॅग्स :Waterपाणी