शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीला पंचधारा नदीच्या पुराचा धोका

By admin | Updated: August 4, 2016 00:39 IST

सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे

मदतीची मागणी : आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव वर्धा : सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे. अल्पशा पुरानंतर पाणी गावात शिरत असल्याने नदीकाठावरील घरे व रहिवाशी असुरक्षित झाले आहे. प्रशासनाकरवी आपत्ती व्यवस्थापनाचा कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवाल यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. पंचधारा नदीच्या काठावर टाकळी (झडशी) हे गाव वसले आहे. नदीला थोडा जरी पूर आला तरी पुराचे पाणी येथील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. या पुराचा धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. पुरामुळे असुरक्षिततेत जीवन जगणाऱ्या येथील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार केली. याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील घरांना पुरापासून धोका आहे. येथे बांधलेले ओटे आणि बांध खचत आहेत. पूर वाढल्यास घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेची हानी व जीवितास धोका आहे. निवेदन देताना डॉ. सतीश सावरकर, विष्णू सावरकर, प्रफुल्ल सावरकर, गजानन दोडके आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी) अल्पशा पुरानंतर गावात शिरते पाणी सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंचधारा नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी हल्ली घरापर्यंत पोहोचले आहे. नदी काठावरील घरांसमोर असलेला अर्धाअधिक रस्ता हा पाण्यात असून येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात जागुनच रात्र काढावी लागते. आणखी किती दिवस पुरावर लक्ष ठेवण्याकरिता येथील नागरिकांच्या नशीब रात्रीची झोप येणार नाही हे सांगणे कठीण आहे. नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. आता बांधलेले ओटे किंवा टाकलेले बांध खचु लागले आहेत. आताच पुराचे पाणी घरापर्यंत पोहोचते आहे.