शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांची तालुका कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:22 IST

नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देचर्चेअंती आंदोलन मागे : ५७ कुटुंबीयांना मिळाली होती नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.तहसीलदारांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळात युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ आदींची उपस्थिती होती. आलोडी येथील अतिक्रमणधारकांना प्राप्त झालेल्या नोटीस मध्ये त्यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याचा सुचना करण्यात आल्या होत्या. सदर नोटीसकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल, अशी सुचनाही करण्यात आले होते. सदर नोटीस आलोडी भागातील शासकीय जागेवर सुमारे ३० वर्षांपासून अतिक्रमण करून राहणाऱ्या ५७ कुटुंबियांना देण्यात आल्यावर त्यांच्यात तालुका प्रशासनाबाबत रोष निर्माण झाला होता. संतप्त अतिक्रमणधारकांनी सोमवारी सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात न्यायासाठी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयाच्यावतीने होणारी कार्यवाही अतिक्रमण धारकांवर अन्यायकारक असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर युवा परिवर्तन की आवाजचे निहाल पांडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांनी तहसीलदार मनोहर चव्हाण व नायब तहसीलदार शकुंतला पाराजे यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पलाश उमाटे, समिर गिरी, गौरव वानखेडे, पंकज गणोरे, अक्षय बाळसराफ, शेखर इंगोले, सोनू दाते, सौरभ माकोडे यांच्यासह अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.