शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार गावासाठी खासदारांनी हाती घेतली टिकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:53 IST

तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : कंचनपूर येथे केले ग्रामस्थांसह प्रत्यक्ष श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत. श्रमदात्या ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी खा. रामदास तडस यांनी कंचनपूर येथे जावून स्वत: हातात टिकास व पावडे घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले.कंचनपूर या गावात वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरूण-तरूणींसह ग्रामस्थ विविध जलसंवर्धनाची कामे करीत आहेत. कंचनपूर हे गाव १०० टक्के आदिवासी समाज बांधव वास्तव्यास असलेले गाव असून या गावातील नागरिक शेती व शेती पुरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढतात. या गावाला खा. रामदास तडस यांनी सदिच्छा भेट देऊन येथे राबविण्यात येणाऱ्या श्रमदान उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. यावेळी रसुलाबादच्या सरपंच राजश्री धारगवे, ग्रामसेवक अशोक बोबडे, विलास सावरकर, गजानन पिंगळे, हरिष पाटील, नितीन धाडसे, मंगेश सावरकर, दिनेश कुसराम, राजू मानकर, डॉ. लोकेंद्र दाभिरे, कल्पना उईके, साहेबराव वेळूकर, पांडुरंग मानकर, शंकर मानकर, रवी मानकर, राहुल सावरकर, सुरेश सावरकर, मंदा चोरांबे, अजाब मांगुळकर, विठ्ठल राऊत, विजय सावरकर, लुकेश सावरकर, चंद्रशेखर सावरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्यांनीही श्रमदान केले.दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे -तडसपाण्याची बचत, पाण्याचा काटेकोरपणे वापर, व्यवस्थापन आणि प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर या सूत्रानुसार पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. गावकऱ्यांनीही जलसंवर्धनाच्या या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. सर्वसामान्य काय करू शकतो हे आज वॉटर कपच्या माध्यमातून दाखवून देण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सामूहिकपणे दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा