शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींचे आदीनिवास टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:46 IST

येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात पारंपरिक पद्धतीने उपाययोजना : पर्यटकांना काही दिवस या इमारत परिसरात ‘नो एंट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. ही दुरूस्ती करताना मुख्य इमारतीत कुठलाही फरक पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.आश्रमाला बरेच वर्ष झाले असून येथील प्रत्येक इमारत माती, कुड, बल्ली, बांबू, बोरे, कवेलू आदि स्थानिक साहित्याच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे. यामुळे त्या वास्तुची वर्षाला ऋतू बदलताच सुरक्षा करावी लागते. सध्या परिसरात माकडांचा हैदोस वाढल्याने या छाताची दैनावस्था झाली आहे. शिवाय या दिवसात छतावरील कवेलू फेरावे लागतात.आश्रमातील या पहिल्या कुटीचा मागचा भाग वाकल्याने त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. कुटी राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यांच्या जतन व संरक्षणाच्या दृष्टीने बल्ली व बांबूवर विशेष प्रक्रिया करण्यात येत आहे. बांबू मोरचूद, गोमुत्र, निंबोळी अर्क इत्यादीच्या मिश्रणात ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करून मागील भाग तशाचा तसा नव्याने बनविण्यात येत आहे. ही दुरूस्ती २० ते २५ वर्षानंतर होत असल्याची माहिती अधीक्षक भावेष चव्हाण यांनी दिली. लवकरच नव्याने मागचा भाग तयार होवून दर्शनार्थी पाहू शकेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या हे काम जोरात असून ते लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.१०० रुपयांत तयार झाले होते आदिनिवास१९३६ मध्ये गांधजींनी शेगावमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जमनालाल बजाज यांच्या मालकीच्या शेतातील जांबाच्या बागेत अस्थाई झोपडी करून गांधीजी सहकाऱ्यांसोबत राहिले. चार-पाच दिवसानंतर ते चरखा यात्रेसाठी निघाले. या ठिकाणी राहण्याच्या निर्णय झाल्यानंतर प्रथम कुटी बनविण्यासाठी काही अटी मीराबहन, बलवंतसिंग, मन्नालाल शहा यांनी समोर ठेवल्या. यात स्थानिक संसाधन कारागिर व १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च नको, असे सुद्धा सांगितले. बापू चरखा यात्रेला गेल्यानंतर प्रथम निवासस्थानच्या कामाला सुरूवात झाली. १६ जून १९३६ मध्ये बापू परत शेगावला आल्यानंतर याच कुटीमध्ये ते कस्तुरबा आणि अन्य सहकाºयांसोबत राहिले. १९४२ च्या ठरावाची बैठक सुद्धा याच कुटीत झाली होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी