शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
3
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
4
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
5
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
6
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
7
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
8
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
9
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
10
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
11
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
12
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
13
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
14
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
15
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
16
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
17
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
18
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
19
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

शाळा सकाळच्या सत्रात घ्या; ‘झेडपी’च्या सीईओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:48 IST

पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती.

ठळक मुद्देशिक्षक संघटनांची मागणी : पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उकाड्यामुळे घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश निर्गमित केले आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात होणार आहे.शासनाच्या धोरणानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनपासून नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गावांमध्ये आणि शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. वातावरणातील प्रचंड उकाडा, वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी दिवसभर विद्यार्थी बेचैन झाले असून आजारी पडण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.विद्यार्थ्यांचा विचार करुन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी लागलीच २८ जूनपासून १३ जुलै २०१९ पर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश दिले. सकाळी ७ वाजतापासून १२ वाजतापर्यंत शाळा घेऊन शाळांचे कामकाज प्रभावित होणार नाही; यासोबतच सध्याची परिस्थिती लक्षात घेता आवश्यक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहे.जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची वेळ सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी १२ वाजतापर्यंत ठरवून देण्यात आली असून सकाळी ७ ते ७.२० पर्यंत प्रार्थना व परिपाठ होईल. त्यानंतर तासिकेला सुरुवात करुन दुपारी १२ वाजता शेवटची ८ वी तासिका होईल.