शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

‘त्या’ पदाधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करा

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

जिल्ह्याच्या महसूल विभागामध्ये सन २०१४ मध्ये विविध पदाकरिता सेवा भरती प्रक्रिया घेण्यात आली. यात सेलू तालुक्यांतर्गत पार पडलेल्या कोतवाल भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती ...

वर्धा : जिल्ह्याच्या महसूल विभागामध्ये सन २०१४ मध्ये विविध पदाकरिता सेवा भरती प्रक्रिया घेण्यात आली. यात सेलू तालुक्यांतर्गत पार पडलेल्या कोतवाल भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती संवर्गातील पात्र व्यक्तीवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप बहुजन फेडरेशन आॅफ इंडियाचे वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष एस. एच. ठमके यांनी केला आहे. यासंदर्भात सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर आणि निवड समितीतील पदाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फ त राज्यपाल के. शंकरनारायण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी सेलू तालुक्यात कोतवाल पदभरती प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती संवर्गातील व्यक्तींना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. विनोद मारोतराव कांबळे (३६)े रा. सुरगाव (रेहकी), ता. सेलू, जि. वर्धा हे अनुसूचित जाती संवर्गातील रहिवासी असून त्यांचे वडील मारोतराव कवडूजी कांबळे यांनी १९७५ पासून २००७ पर्यंत सेलू तालुक्यांतर्गत साझा क्र. १३ मध्ये तब्बल ३२ वर्षे कोतवालाच्या पदावर काम केले. शासनाच्या निर्गमित नियमानुसार विनोद हा २००७ मध्ये सेलू साझ्यावर रिक्त झालेल्या कोतवाल पदाच्या जागेवर नियुक्त होण्यास कायदेशीररित्या पात्र होता. विद्यमान कायद्याच्या अपरिहार्यतेस लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वर्धा यांच्या कार्यालयीन पत्र क्र. कक्ष-ब/कलि/आस्था-२-१०९४/१३ दि. ११ नोव्हेंबर २०१३ अन्वये निर्देशिलेल्या सूचनेवारून सदर पदाकरिता तहसीलदार सेलू यांनी त्यांचा जाहीरनामा क्र. /कली/त. आस्था/कावी ३९/२०१४ दि. १० जानेवारी २०१४ मध्ये कोतवालाची भर्ती करताना सेवानिवृत्त कोतवालाच्या वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याबाबत जाहीर केल होते. परंतु केलेल्या जाहीरनाम्यानुसार सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांनी गठीत केलेल्या निवड समितीतील पदाधिकार्‍यांनी सदर पदावर उमेदवारांची निवड करताना कायदेशीर पात्र असणार्‍या विनोद कांबळे याला डावलल्याचा आरोप फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. सदर तहसील कार्यालयाद्वारे गठित केलेल्या निवड समिती मधील अधिकार्‍यांच्या उक्त आपराधिक स्वरूपाच्या कृतीतून भारतीय घटनेचे कलम १७ मधील प्रावधानाची अवहेलना झाली असून नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ मधील प्रावधानाच्या उल्लंघनार्थ सदरची कृती अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) नुसार दंडात्मक कार्यवाहीस पात्र आहे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडिया जिल्हा शाखा वर्धाचे अध्यक्ष एस. एच. ठमके यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फात राज्यपाल के. शंकरनारायण यांना निवेदन सादर केले. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री यांना देण्यात आल्या.(शहर प्रतिनिधी)