शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

काँग्रेसचे तहसीलसमोर धरणे

By admin | Updated: December 1, 2014 22:58 IST

येथील काँगे्रस कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूगांवकर यांना सोपविण्यात आले.

कृषीविषयक मागण्या : तहसीलदरांना निवेदन सादरहिंगणघाट : येथील काँगे्रस कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूगांवकर यांना सोपविण्यात आले.सादर केलेल्या निवेदनात सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत, कापसाला सहा हजार रुपये क्विंटल भाव देऊन बाजार भावातील फरकाची रक्कम बोनस म्हणून देणे, ओलिताच्या व बागायदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत, शेती कर्ज व वीज पंपाचे देयक माफ करण्याची व जवखेडा येथील हत्याकाडांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नमूद आहे.यंदा पावसाअभावी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनला उतारी नाही. कापसाला भाव नाही. अतिवृष्टीमुळे धान पीक नष्ट झाले तर अवकाळी पाऊस, वादळी वारा यामुळे फळबाग उद्ध्वस्त झाल्या. अपुऱ्या पावसामुळे विदर्भ मराठवाड्यासह राज्यात अन्यत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना काँगे्रसच्या जि.प. सदस्य उषाकिरण थुटे यांच्यासह रजनी वानखेडे, लता घवघवे, प्रा. दिवाकर गमे, डेहणे पाटील, प्रदीप आर्य, प्रा. येरळेकर, चंद्रकांत पिठाडे, दिनकर लांबट, गिता मांडवकर, अरुण परटक्के, सतिश चरडे, प्रफुल्ल महंतारे, दिनेश हरबडे, मारोतराव सवाई, शेख सरफू, नाना गंधारे, गोपाळ मांडवकर, राजू अवचट, वसंत खडसे, बाबाराव शेगोकर यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)