शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित पांदण रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: April 27, 2017 00:47 IST

पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नसल्याचे दिसते.

पालकमंत्री पांदण रस्ते योजना : मोबाईल अ‍ॅपची सुविधा वर्धा : पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नसल्याचे दिसते. मात्र पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यातील अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहे. यात आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील अतिक्रमित पांदण रस्ते मोकळा श्वास घेत असून याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी प्रशासनाने मोबाईल अ‍ॅप तयार केले. तसेच संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना यामुळे जिल्हास्थळी येऊन माहिती देण्याची गरज नाही. यात वेळ आणि श्रम वाचत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला दोन पोकलँड मशीन प्राप्त झाल्या असून शेतकरी किंवा गावकऱ्यांना अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करून अडचणी दूर करण्यासाठी आॅनलाईन करावे. यासाठी प्रति दिवसाकरिता २ हजार ५०० रूपये भरून मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. शेतकऱ्यांकरिता जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये अतिक्रमित पांदण रस्ते, गावरस्ते, वाहिपेरीसाठी असलेल्या वहिवाटा मोकळ्या नसल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेतीविषयक कामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात अतिक्रमण मुक्त पांदण रस्ते योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील दारोडा व आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात आले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)