शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करा

By admin | Updated: August 26, 2014 00:10 IST

अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिरूड येथे जादुटोण्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला़ या प्रकरणात पोलिसांनी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला़ या प्रकरणात जादुटोणा

वर्धा : अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिरूड येथे जादुटोण्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला़ या प्रकरणात पोलिसांनी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला़ या प्रकरणात जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे़ या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे़गुरूवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत शिरूड येथे जादुटोण्याचा संशय घेऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला़ यात आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ वास्तविक डॉ़ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आलेल्या जादुटोणा विरोधी कायद्याच्या कलम ३ (२), ६ अन्वये गुन्हा दाखल करणे गरजेचे होते़ यामुळे जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेत निवेदन सादर केले़ शिरूड येथे विजय उरकुडकर याने जादुटोणा, करणी करते, असे म्हणत गुरूवारी सकाळी पानटपरी उघडत असताना दशरथ उरकुडकर यांच्यावर अचानक गुप्तीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले़ घटनेनंतर काही न झाल्याचा आव आणत आरोपी शेतात गेला़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी विजय उरकुडकर यास भादंविच्या कलम ३०६ अन्वये अटक केली़ जादुटोण्याच्या संशयाचा प्रश्न असल्याने गजेंद्र सुरकार, किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, भाकपचे राजू गोरडे, प्रजासत्ताक शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण हर्षबोधी, प्रकाश कांबळे, प्रभाकर पुसदकर, नरेंद्र कांबळे, सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा़ नुतन माळवी, श्रेया गोडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले़ यावर त्वरित कारवाई करण्याची हमी दिली़ अल्लीपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता कायद्याची प्रत नसल्याने गुन्हा नोंदविला नाही, असे सांगण्यात आले़ यामुळे शिष्टमंडळाने अल्लीपूर पोलीस ठाण्यात विजय मगर यांना कायद्याची प्रत देत चर्चा केली़ यात वरिष्ठांची संमती घेऊन कारवाई करण्याची हमी दिली़ यानंतर शिष्टमंडळाने संबंधित कुटुंबाची भेट घेऊनही माहिती जाणून घेतली़(कार्यालय प्रतिनिधी)