शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
3
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
6
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
7
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
8
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
9
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
10
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
11
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
12
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
13
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
14
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
15
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
16
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
17
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
18
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
19
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
20
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका

बेशिस्त, भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा

By admin | Updated: June 10, 2016 02:14 IST

ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद हे १५ ते २० वर्षांपासून काँग्रेसच्या

पत्रकार परिषदेतून शिवसेनेची मागणीकारंजा (घा.) : ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद हे १५ ते २० वर्षांपासून काँग्रेसच्या आशीर्वादाने कार्यरत होते. नोकरी करीत असताना शासकीय वेळेत ते खासगी दवाखानाही चालवित होते. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना शासकीय ऐवजी डॉ. शकील यांच्या खासगी दवाखान्यात अधिक पैसे देत उपचार घ्यावे लागत होते. अशा बेशिस्त अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केली.ग्रामस्थांनी अनेकदा प्रस्थापित पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या; पण डॉक्टरशी जवळीक असल्याने सामान्यांना न्याय मिळाला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर तालुका प्रमुख संदीप टिपले यांच्या नेतृत्वात डॉ. शकील यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. २० डिसेंबर २०१५ रोजी शासकीय कामकाजाच्या दिवशी व वेळेत डॉ. शकील यांच्या खासगी दवाखान्यात शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, पदाधिकारी व शिवसैनिकांनी धाड टाकली. यात डॉ. शकील शासकीय दिवशी व वेळेत खासगी दवाखाना चालविताना आढळले. या धाडसत्राचा तपशील आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना सोपविला. यावरून आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या चौकशी अहवालात डॉ. शकील शासकीय दिवशी व वेळेत खासगी दवाखाना चालवित असल्याचे व रुग्णांकडून शासकीय दाखल्यासाठी पैसे घेत असल्याचे तसेच रुग्णांशी असभ्य वर्तणूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत त्यांची पेंडरी येथे बदली करण्यात आली. शिवाय त्वरित कार्यरत असलेले ठिकाण सोडून बदली झालेल्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले.जिल्ह्यातील कामचुकार व भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. सामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना अकारण त्रास दिला जात असेल तर त्यांच्यावर योग्य कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी पत्रपरिषदेतून दिला. यावेळी उपजिल्हा प्रमुख आर्वी विधानसभा क्षेत्राचे बंडू कडू, माजी उपजिल्हा प्रमुख गजानन ढोले, माजी तालुका प्रमुख प्रकाश घागरे, तालुका प्रमुख संदीप टिपले, अमोल चरडे, सारंग भोसले, ज्योती हरणे, प्रियंका वंजारी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)