शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड माफियांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:22 IST

जिल्ह्यात शासकीय भूखंडावर आर्थिक सक्षम लोकांनी अतिक्रमण करून ते हडप केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जनसुरक्षा परिषदेचे जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात शासकीय भूखंडावर आर्थिक सक्षम लोकांनी अतिक्रमण करून ते हडप केले. सावंगी (मेघे) येथील शेत सर्व्हे क्र. १५५ मधील रेल्वेची हद्द असलेली जागा ओपन स्पेस दाखवून कर्मचाºयांशी संगणमत करीत ले-आऊट मंजूर करून घेतले. प्लॉटही विकलेत. त्या ले-आऊटची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी जनसुरक्षा परिषदेने केली. याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले.अनेक ले-आऊट धारकांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून अवैधरित्या ले-आऊट विकसित करीत जनतेची फसवणूक केली. यातून कोट्यवधीची मालमत्ता जमा केली. आलोडी येथील स्मशान भूमीच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण हटविण्यास ग्रा.पं. प्रशासन व वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करीत आहे. गोपुरी ते साटोडा हा २४ मीटरचा रस्ता असून तेथे रस्त्यालगतच्या धनदांडग्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे तो रस्ता अत्यंत अरूंद झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे जागांची मोजणी करीत रस्ता मोकळा करणे तथा ले-आऊटची कसून चौकशी करणे गरजेचे झाले आहे.आर्वी नाक्यावरील वसाहतीत ४० वर्षापूर्वीपासून वडर समाज वास्तव्य करून आहे. या गरीब लोकांना जमिनीचे मालकी हक्क देण्यात यावे. इंदिरा आवास योजनेतून शासनाने बांधून दिलेल्या झोपड्यांवर ले-आऊट धारक ग्रा.पं. ला हाताशी धरून बळजबरीने व शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करून झोपड्यांची जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सावंगी (मेघे) येथील शेत सर्व्हे क्र. १५५ येथील ले-आऊटही अवैधरित्या विकसित करण्यात आले आहे. शिवाय भूखंड क्र. ८१/१ आलोडी, भूखंड क्र. २७ नालवाडी, भूखंड क्र. ७२/२ या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकरणी चौकशी करावी तथा दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी परिषदेने केली. निवेदन देताना अध्यक्ष भास्कर भगत, सूर्यभान तिडके, अशोक देशमुख, नागोराव पवार, अरुण गावंडे, रमेश सोनटक्के, प्रदीप वाघमारे, गजानन जाधव, रमेश सावळे, दिवाकर हेलगे आदी उपस्थित होते.