शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:18 IST

तालुक्यातील बेलगाव परिसरातील एका दिव्यांग मुलीवर १३ एप्रिलला तीन जणांनी अतिप्रसंग केला. हा प्रकार निंदनिय असून सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमागणी : माया इवनाते यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा (घा.) तालुक्यातील बेलगाव परिसरातील एका दिव्यांग मुलीवर १३ एप्रिलला तीन जणांनी अतिप्रसंग केला. हा प्रकार निंदनिय असून सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांना सादर केले आहे.पीडिता ही दुपारच्या वेळेस प्रात:विधीकरिता गेली असताना त्याच गावातील तीन युवकांनी तिचा पाठलाग करीत तिला जबरी गोठ्यात नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. सुरूवातीला पीडिता ही घाबरली असल्याने तिने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. परंतु, काही प्रत्यक्षदर्शियांनी मुलीच्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर १८ एप्रिलला या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात गावातील मंडळीसोबत तक्रार दाखल करण्यास पीडिता गेली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. दिवसभर तक्रार देण्यास ताटकळत ठेवल्यानंतर सायंकाळी सायंकाळी ६ वाजता तक्रार घेण्यात आली. सदर प्रकरणी तक्रार घेते वेळी आरोपींविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त असताना केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी सुरूवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. त्यामुळे पीडितेला न्याय मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, तसेच कामात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्ह्य अध्यक्ष प्रमोद कुरटकर, हनुमंतराव झोटिंग, नितेश चतुरकर, राजेश सावरकर, विजय सुरकार, सुनील मिश्रा, शैलेश सहारे, प्रशिल धंदे हजर होते.

टॅग्स :Rapeबलात्कार