सदस्याचे जिल्हा परिषद प्रशासनाला साकडेआर्वी : तालुक्यातील भाईपूर येथील भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांना भूखंड वाटपाची कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्य गजानन गावंडे यांनी केली आहे. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून सभेतही मुद्दा लावून धरला होता. तालुक्यातील वाठोडा व बोरगाव (हातला) येथील प्रकल्पग्रस्तांनी भाईपूर, बोरगाव (नांदोरा) पुनर्वतिस गावठाणामध्ये भूखंड शिल्लक आहे. ते बांधकामास योग्य नसल्याने पुनर्वसित गावठाण वागदा येथे भूखंड मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. त्यानुसार बोरगाव येथील नागरिकांना वागदा येथील मंजूर नसलेल्या ले-आऊमध्ये भूखंड वाटप करण्यात आले होते; पण वाठोडा, भाईपूर येथील अर्जदारांना भूखंड कमी पडत असल्याने वाटप करण्यात आले नव्हते. यानंतर वागदा पुनर्वसन गावठाणातील शिल्लक जागेची मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नगर रचनाकारांकडे त्यावर भूखंड पाडून देण्याबाबत प्रस्ताव पाठविला. नगर रचनाकारांनी त्या प्रस्तावास मंजुरी दिली. यानंतर भूखंड पाडण्याकरिता पत्र देण्यात आले; पण अद्याप तेथे भूखंड पाडण्यात आले नाहीत. तेथे अतिक्रमण झाल्याने भूखंड निर्मितीत अडचणी येत आहे. हे अतिक्रमण हटवून भाईपूर येथील अर्जदारांना भूखंड वाटप करावे, अशी मागणी जि.प. सदस्य गावंडे यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभेमध्येही प्रश्न लावून धरला आहे.(तालुका प्रतिनिधी)
अतिक्रमण काढून भूखंड वाटपाची कारवाई करा
By admin | Updated: October 26, 2016 01:02 IST