शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

मेळाव्याकडे आमदारांसह नेत्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:22 IST

भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.मेळाव्याला आपसांतील गटबाजीमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमदार समीर कुणावार, जिल्हा विस्तारक जयंत उर्फ गुंडू कावळे, अर्चना वानखेडे, भाजपचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांनी मेळाव्यात येण्याचे टाळले. या घटनाक्रमाने भाजपमधील गटबाजीच्या चर्चेला उधाण आले आहे.या मेळाव्यात शहरातील दोन शक्ती प्रमुखापैकी सुनील शेंडे हे एकच शक्ती प्रमुख उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश मेंढे, प्रकाश सिरसे, नरेंद्र सेलूकर, नगरसेवक अमोल बोंगाडे, इम्रान पठाण, अमोल गवळी, पंकज पराते, प्रभाकर तुमाणे, अनिल साखळे हे शहरातील १० बूथ प्रमुख आहेत. ते प्रामुख्याने गैरहजर होते. भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे वगळता सरचिटणीस सुनील वाणकर, प्रशांत बोरीकर, संघटक जयंत बडवाईक, कोषाध्यक्ष संजय इटनकर, ओमप्रकाश राठी, मधुकर गुल्हाणे, प्रवीण सिर्सिकर यांनी अनुपस्थित राहून रोष व्यक्त केला.भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका अजया साखळे, बांधकाम सभापती बबिता तुमाणे, वंदना सेलूकर, पुष्पा सिरसे, चंदा बोरकर, अमोल बोंगाडे, प्रकाश मेंढे या भाजपच्या नगरसेवकांनीही मेळाव्याकडे पाठ फिरविली. या मेळाव्यात १६ कार्यकर्ते, नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्षा वंदना डकरे, भाजपचे विस्तारक पवन परियाल, शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे यांचीच उपस्थिती होती.हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांकरिता लावलेला स्टेज संख्येअभावी खाली घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. या सर्व घटनेची माहिती आमदार समीर कुणावार यांना मिळाल्याने मेळाव्याचे प्रमुख असूनही ते इकडे फिरकले नाही.भाजपची नगरपालिकेत सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक, शहरातील पतसंस्था, सोसायट्यांमध्ये पक्षाचे अनेक संचालक आहेत. पक्षाच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लांबच लांब फळी असतानाही मेळावा अपयशी ठरला. सध्या सभोवतालच्या २५ पेक्षा अधिक गावांत ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशा स्थितीत भाजपातील दुफळी चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :BJPभाजपा