शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना कोंडताच कामांना गती

By admin | Updated: May 12, 2016 02:19 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते.

शेतकऱ्यांचे आंदोलन : तीन वर्षांपासून प्रलंबित विहीर दुरूस्ती प्रक्रियेला वेगआर्वी : रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. बुधवारी शेतकरी व भाजयुमो जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी आंदोलन करीत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना त्यांच्या कक्षात कोंडून ठेवले. या आंदोलनाचा धसका घेत गुरुवारपासून मनरेगा अंतर्गत मंजूर विहिरींचे अंदाज -पत्रक तयार करण्याचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी अनुदानही जाहीर करण्यात आले. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयाने २०१३ मध्येच तयार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पाठविली; पण त्यांनी अभियंता नसल्याने विहीर दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे शक्य नसल्याचे कारण देत काम ठप्प ठेवले. शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली. याची दखल घेत त्यांनी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पंचायत समितीकडे १८ मोर्च रोजी सोपविले; पण पंचायत समितीच्या अभियंत्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. याचा फटका शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला बसला. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्याकडे समस्या मांडल्या. यावरून जगताप यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयातील कक्ष गाठला. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना कक्षातच कोंडून ठेवले. जोपर्यंत अंदाज पत्रकाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत कक्ष सोहणार नाही, असा निर्धार जाहीर करण्यात आला. परिणामी, तहसीलदार मस्के यांनी पं.स. गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, अभियंता दौलतकर, तालुका कृषी अधिकारी खेडकर यांना बोलवून चर्चा केली. तीन अभियंत्याचे सहकार्य घेत गुरुवारपासून कामाला सुरुवात करून चार दिवसांत अंदाजपत्रक तयार करून देण्याची ग्वाही दिली. या आंदोलनामुळे तीन वर्षांपासून प्रलंबित समस्या मार्गी लागली. आंदोलनात भाजप शहर उपाध्यक्ष सुधीर जाचक यांच्यासह सुरज राठोड, परसराम राठोड, अंबादास लक्षणे, मारोती साठे, धनंजय महाजन, नरेश चव्हाण, कुवरसिंग राठोड, युवराज चव्हाण, रामदास जाधव, कैलास अवथळे, प्रफूल वाळके, भास्कर जाधव, राजू आगरकर, संतोष गौरकार, विक्रम भगत आदींनी सहभाग घेतला.(तालुका/शहर प्रतिनिधी)चार दिवसांत होईल अंदाजपत्रक तयार२०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींची दुरूस्ती करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण अद्याप प्रक्रियाच पूढे सरकली नव्हती. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांनाच त्यांच्या कक्षात कोंडले. परिणामी, चार दिवसांत अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली.