शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव (मि.) वासीयांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST

तालुक्यातील दहेगाव (मिस्किन) येथील गावकऱ्यांना कृत्रिम पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.

ग्रामस्थांनी थांबविले ग्रामपंचायतीचे कामकाज वर्धा : तालुक्यातील दहेगाव (मिस्किन) येथील गावकऱ्यांना कृत्रिम पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यामुळे शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या व्यवस्थेविरूद्ध शनिवारी आंदोलन पुकारून कार्यालयाला घेराव करीत ग्रामपंचायतचे कामकाज बंद पाडले. दहेगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत मुबलक पाणी असून सदर विहीर गत अनेक वर्षांपासून उपयोगात आणली जात नाही. सदर विहिरीचे पाणी अशुद्ध असल्याचे सिद्ध झाले. यामुळे सदर विहिरीत पाणी उपसा करून नागरिकांना ते पिण्यायोग्य करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. असे असताना ग्रामपंचायतचे सचिव व सरपंचाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गत दोन वर्षांपासून आमला ग्रामपंचायतच्या अधिकारातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन ग्रामपंचायत आमला प्रशासनासोबत योग्य सहकार्य करीत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो करण्याची वेळ आली आल्याचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी सावळे हे कायम गैरहजर राहत असल्याने सरपंचाचे पती नितीन गौळकर हेच कारभार पाहत असल्याचा आरोही ग्रामस्थांचा आहे. ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा वर्धा : सुरळीत पाणी पुरवठा करण्यास ग्रा.पं. अपयशी ठरल्यास ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारासुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे. आधार संघटना शाखा दहेगाव पदाधिकारी प्रशांत देशमुख, रमेश मोंढे, गजानन ठुने, किशोर अजबैले, देवेंद्र धोटे, प्रकाश येवले, गजानन ठाकरे, मनोज आरगुडे, विठ्ठल बेसेकर, नितीन इमाने, सतीश पाटील, निलेश ढवळे, प्रफुल डबले, वासुदेव पिपराके, अजमद पठाण, विजय कुलधरीया सुरेश तुमडे, गजानन काटोले, सुरेश तुमडाम, सुनील रोहणकर आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)